spot_img

1868 पासूनच्या दास्तावेजांचे होणार डिजिटायझेशन 

एका क्लिकवर मिळतील 117 वर्षांच्या नोंदी 
उद्या महसूल मंत्री ना. बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटनाची तयारी 

बुलढाणा, 8 ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी) ः महसुली दावे उपविभागीय अधिकारी यांचेकडील न्यायप्रविष्ठ दावे, जमीन संपादन दावे जिल्हयातील तहसिल कार्यालयाच्या स्तरावरील अभिलेख, जन्म-मृत्यु नोंदी, हक्क़नोंदणी, जुने फेरफार, कोतवाली बुक, पेरेपत्रक जुने सातबारा, इत्यादी महसुली स्वरुपाचा महसुली अभिलेखांची आवश्यकता किती आहे, हे कुणाला न सांगणे लागे. त्यातच जर 1868 पासूनचे दस्तावेज असतील तर ते किती जीर्णावस्थेत आणि किती जुनाट असतील, याविषयी काय सांगावे. यावर उपाय म्हणून एकदाच सर्व कागदपत्रांचे डिजीटायझेशन करून हा सर्व अभिलेख तांत्रिकदृष्ट्या संरक्षीत करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे. गुड इव्हिनिंग सिटीला मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा निबंधक तथा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे संकल्पनेतुन, सह. दुय्यम निबंधक सागर पवार आणि मुद्रांक जिल्हाधिकारी संजय ठाकरे यांच्याद्वारे नोंदणी व मुद्रांक विभागातील सन 1868 ते सन 1964 पर्यतच्या अभिलेखाचे डिजीटायजेशन होणार आहे. यामुळे सहज प्रणाली व्दारे अभिलेख एका क्लिक वर मिळणार आहे. जिल्ह्यातील सर्व महसुली शाखांचे संगणकीकरण करण्यात आले असुन सॉफ्टवेअरच्या माध्यमातुन सर्व ऐतिहासीक दस्तऐवजांचे डिजिटायझेशन करण्यात आले आहे. त्यामध्ये महसुली स्वरुपाचा महसुली अभिलेख सहज प्रणालीव्दारे नागरीकांसाठी सुलभतेने उपलब्ध करुन दिला आहे. त्याच धर्तीवर नोंदणी व मुद्रांक विभागातील अभिलेख एका क्लिकवर उपलब्ध करुन देण्याचा मानस जिल्हा निबंधक तथा जिल्हाधिकारी बुलढाणा यांचा आहे. डॉ.किरण पाटील जिल्हा निबंधक तथा जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी नोंदणी व मुद्रांक विभागातील सह दुय्यम निबंधक कार्यालय बुलढाणा यांचे अधिकार कक्षेतील केंद्रीय अभिलेख कक्षाचे निरीक्षण केले. त्यावेळी नोंदणी व मुद्रांक विभागातील संपुर्ण जिल्ह्यातील तालुका निहाय सन 1868 ते सन 1985 पावेतोचा एकुण 117 वर्षाचा अभिलेख कायम स्वरुपी जतन करून ठेवला आहे. सदर अभिलेख हा मिळकतीच्या नोंदणीकृत दस्ताचा असल्याने त्यास अत्यंत महत्व आहे. पिढ्यानपिढ्या उपयोगात येणार्‍या या अभिलेखाचे संगोपन तसेच संरक्षण करण्यासाठी अभिलेखाचे डिजिटायजेशन करणे आवश्यक आहे. डिजिटायजेशनसाठी आवश्यक तरतुद जिल्हा नियोजन मध्ये करण्याचे जिल्हा निबंधक तथा जिल्हाधिकारी यांनी सुचीत केले आहे.
सह दुय्यम निबंधक कार्यालय बुलढाणा यांचे अधिकार कक्षेतील केंद्रीय अभिलेख कक्ष हा जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांचे आवार आहे. सदर अभिलेख कक्षास डॉ. किरण पाटील, जिल्हा निबंधक तथा जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी भेट देऊन अभिलेख कक्षाची पाहणी केली असता, सदर अभिलेख कक्षात सन 1868 ते 1985 पर्यंतच्या नोंदणीकृत दस्ताचा अभिलेख जतन करून ठेवला आहे. सदर अभिलेख जिर्ण होत असुन त्याचे संरक्षण करणेसाठी अभिलेखाचे डिजिटल स्कॅनिंग होणे आवश्यक असल्याने अभिलेखाचे डिजिटायजेशन सहज प्रणाली व्दारे करण्याचा मानस जिल्हाधिकारी बुलढाणा केला आहे. त्यामुळे जिल्हयातील नोंदणी व मुद्रांक विभागातील केंद्रीय अभिलेख कक्षातील सन 1868 ते 1985 पर्यतचा एकुण 117 वर्षांचा अभिलेख सहज प्रणालीच्या माध्यामातुन एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
यापुर्वी नागरीकांना जुने दस्तऐवज मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील केंद्रीय अभिलेख कक्षास भेट देऊन आवश्यक अभिलेखाचा शोध घ्यावा लागत असे, मात्र वरील अभिलेखाचे डिजिटायजेशन झालेनंतर सदर अभिलेख नागरीकांना सहज प्रणालीव्दारे उपलब्ध करुन दिल्यास नागरीकांना केंद्रीय अभिलेख कक्ष बुलढाणा येथे येण्याची गरज पडणार नाही. सदर अभिलेखाचा शोध नागरीकांना वर्ष निहाय व दस्त क्रमांक निहाय घेणे सोईच ठरेल,
बुलढाणा जिल्हयातील नागरीकांना आता जिल्हयातील सहज प्रणालीव्दारे कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही वेळी नोंदणी व मुद्रांक विभागातील अभिलेखाचा शोध घेणे सोईचे होणार आहे. त्यासाठी नागरीकांना सहजप्रणालीव्दारे ऑनलाईन शुल्काचा भरणा करून अभिलेखाची पाहणी करता येईल, आवश्यक अभिलेख सहजपणे उपलब्ध करुन घेणे शक्य होणार आहे. अभिलेख प्रत प्राप्त करुन घेणेसाठी सह दुय्यम निबंधक कार्यालयात चकरा मारण्याची गरज नाही, हा उपक्रम जिल्हा निबंधक तथा जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांच्या संकल्पनेतुन आकारास आला असुन यामुळे नागरीकांचा वेळ, पैसा आणि त्रास या तिन्हींची बाबीची मोठी बचत होणार आहे. उद्या, 9 ऑगस्ट रोजी महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बुलढाणा जिल्हा दौर्‍यावर आहेत. त्यांच्या हस्ते या डिजीटायझेनशना उद्घाटन करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाकडून सुरु असल्याचे सुत्रांकडून कळते.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत