◾खामगाव, रायपूर, धाड आणि कि. राजाच्या ठाणेदारांचा समावेश
बुलडाणा, 9 ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी) : बुलढाणा जिल्हा पोलिस अधीक्षक पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर एसपी निलेश तांबे यांनी विविध बदलांचा सपाटा लावाला आहे. पोलिस प्रशासन गतीमान व पारदर्शक करण्याकडे एसपी तांबे यांचा भर दिसून येत आहे. किचकट गुन्ह्यांचा तपास, अवैध धंद्यांवर जरब बसविणे, गुन्हेगारांमध्ये कायद्याची भिंती निर्माण करण्याचे काम करत आहेत. यासोबतच पोलिस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांच्या बदल्या केल्या आहेत. बुलडाणा पोलिस दलातील विविध ठिकाणच्या ठाणेदारांच्या बदल्या केल्या आहेत. यासंबंधीचे प्रसिद्ध पत्रक ८ ऑगस्ट रोजी पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांनी काढले आहे. यामध्ये शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पितांबर जाधव यांची बदली ठाणेदार पोलिस स्टेशन ग्रामीण अतिरिक्त कार्यभार श्री संत गजानन महाराज मंदिर सुरक्षा शेगाव, नियंत्रण कक्ष बुलढाणा पोनि सुरेंद्र आहेरकर यांची बदली ठाणेदार पोलिस स्टेशन शिवाजीनगर तर श्री संत गजानन महाराज मंदिर सुरक्षा शेगाव पोनि हेमंत ठाकरे यांची बदली प्रभारी अधिकारी जिल्हा वाहतूक शाखा बुलढाणा येथे करण्यात आली आहे. प्रभारी अधिकारी सुरक्षा शाखा बुलढाणा पोनि अशोक काकविपुरे यांची बदली प्रभारी अधिकारी जिल्हा विशेष शाखा बुलढाणा, धाडचे ठाणेदार आशिष चेचरे यांची बदली शिवाजी नगर पोलीस स्टेशन खामगाव, बुलढाणा शहर पोलिस स्टेशनचे सपोनि प्रताप भोस यांची बदली धाड पोलिस स्टेशनचे ठाणेदार पदी, किनगाव राजाचे ठाणेदार विनोद नरवाडे यांची बदली नियंत्रण कक्ष बुलढाणा, चिखली पोलिस स्टेशनचे सपोनि संजय मार्तोडकर यांची बदली ठाणेदार किनगाव राजा पोलिस स्टेशन, रायपूरचे ठाणेदार दुर्गेश राजपूत यांची बदली प्रभारी अधिकारी दहशतवादी विरोधी कक्ष बुलढाणा, प्रभारी अधिकारी जिल्हा वाहतूक शाखा स्वप्निल नाईक यांची बदली पोलिस स्टेशन नांदूरा, मलकापूर पोलिस स्टेशनचे सपोनि मल्हारी शिवरकर यांची बदली प्रभारी अधिकारी सुरक्षा शाखा बुलढाणा, नियंत्रण कक्ष बुलढाणा अशोक अवचार यांची बदली पोलिस स्टेशन मेहकर, नियंत्रण कक्ष बुलढाणा धैर्यशील घाडगे यांची बदली जिल्हा वाहतूक शाखा बुलढाणा, नियंत्रण कक्ष बुलढाणा दिलीप राठोड यांची बदली पोलिस स्टेशन शहर मलकापूर, वाचक उपविभागीय पोलिस अधिकारी मेहकर पीएसआय राजाभाऊ घोगरे यांची बदली पोलिस स्टेशन लोणार, पोलिस स्टेशन मेहकर पीएसआय गणेश कड यांची बदली वाचक उपविभागीय पोलिस अधिकारी मेहकर, पोलिस स्टेशन जळगाव जामोद पीएसआय नारायण सरकटे यांची बदली पोलिस स्टेशन जानेफळ येथे झाली आहे.