बुलढाणा, ३ ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी) ः पाडळी येथे बिबट्याने गाईवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. आज ३ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास गिरडा येथे बिबट्याने पाडळी येथील शेतकरी डोंगरसिंग डुकरे यांच्या गाभण गाईवर हल्ल केल्याची घटना घडली आहे. यामध्ये गाय गंभीर जखमी झाली आहे. या आधी सुध्दा बिबट्याने गिरडा येथील शेतकर्यावर हल्ला केला होता यामध्ये त्या शेतकर्याचा मृत्यू झाला होता. आता सध्या सोयाबीन कापणीचा हंगाम सुरू असतांना अशी घटना घडल्यामुळे शेतकर्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वनविभागाने बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करीत आहे. तसेच संबधीत शेतकर्याला तात्काळ मदत देण्याची मागणी शिवसेना विभागप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी केली आहे.



