spot_img

हृदयाचा ठाव, भावनिक ध्यास म्हणजेच कुमार विश्वास

भाईजींच्या अमृत महोत्सवी रंगले ऐतिहासिक कवी संम्मेलन
बुलढाणा, 5 ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत) : 2011 मध्ये अण्णा हजारेंच्या दिल्लीतील भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात खांद्यावर तिरंगा घेऊन नाचणारा एक तरुण आंदोलक कवी विश्वास कुमार शर्मा आज युगकवी कुमार विश्वास म्हणून लोकप्रियतेच्या हिमशिखरावर विराजित आहे. प्रतिभाशाली कवी अनेक आहेत पण रसिकांची नस ओळखून प्रतिभाविष्कार करणारा कवी आजच्या घडीला कुमार विश्वास आहे. त्याला काव्य- साहित्याच्या नभांगणी तळपणारा सूर्य म्हटलं तरी, हे वाक्य खोडण्याची चूक ती व्यक्ती कधीच करू शकत नाही, ज्यांनी सहकार विद्या मंदिरच्या प्रांगणात कुमार विश्वास यांच्यासाठी तुफान गर्दीच्या वादळी टाळ्यांच्या कडकडाट प्रत्यक्ष अनुभवला. बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी यांचा अमृत महोत्सव, बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर यांचा सुवर्ण महोत्सव आणि सौ. कोमलताई झंवर यांच्या नेतृत्वातील सहकार विद्या मंदिरचा रौप्य महोत्सव अशा त्रिवेणी संयोगातून काल, शनिवारी युगकवी कुमार विश्वास यांचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यांच्यासमवेत सुदीप भोला, डॉ. भुवन मोहिनी, विनीत चौहान आणि कुशल कुशलेन्द्र असे राष्ट्र स्तरावरील प्रसिद्ध कवि उपस्थित होते.
कुमार विश्वास यांचे ‌‘कोई दिवाना कहता है..कोई पागल समझता है..‌’, हे गीत तरूणांचे लव्ह अँथम आहे. ‌‘मैं प्रेमकवि हूं, प्रेम बाँटता हूं.. जिस तरह भाईजीने लोगों में सेवा का प्यार बाँटा हैं‌’, या शब्दांत विश्वास यांनी भाईजींच्या कल्पकतेचा आणि गुणग्राहकतेचा विशेष उल्लेख केला. सहकार विद्या मंदीरच्या क्रिकेट स्टेडीअमवर वॉटरप्रूफ पेंडॉलमध्ये भरगच्च गर्दीत कवि संमेलन झाले. प्रारंभीचे सूत्रसंचालन प्रज्ञा आणि पत्रकार गजानन धांडे यांनी केले. तत्पूर्वी भाईजी, माजी नगराध्यक्षा सौ. पुष्पाताई चांडक, मनीष व सौ. किर्तीताई कासट, डॉ. सुकेश आणि सौ. कोमलताई झंवर, सौ. श्रेया भुतडा, चि. श्रवण कासट, कनिष्का झंवर यांनी एकत्रीतपणे कुमार विश्वास यांचा सहृदय सत्कार केला.
प्रास्ताविकातून बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर यांनी संस्थेचा प्रवास संक्षीप्त स्वरूपात मांडला. ‌‘भाईजींच्या मार्गदर्शनात संचालक मंडळाच्या सहकार्याने सभासदांच्या सहयोजूँगातून लोकांचा विश्वास दिवसेंदिवस दृढ होत गेला आणि बुलढाणा अर्बनने मातीशी नातं व जमिनीवर पाय ठेवून आकाशाला गवसणी घातली आहे. अर्थ, शिक्षण, शेती आणि संस्कृतिच्या भक्कम पायावर सहकाराचा सेतू उभारण्याची किमया भाईंजींच्या सेवाभावनेमुळे शक्य झाली असल्याचे भावोत्कट विचारही डॉ. झंवर यांनी व्यक्त केले.
उपस्थित श्रोत्यांमध्ये सर्वच क्षेत्रातील आंमत्रित मान्यवर होते. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव, तसेच आमदार धीरज लिंगाडे, आमदार संजय गायकवाड, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, शेतकरी नेते रविकांत तुपकर, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे या मान्यवरांसह डॉ. शशिकांत खेडेकर, सचिन देशमुख, राजेश देशलहरा, अरूण दिवटे, कवि गोपाल मापारी, विशाल मोहिते, डॉ. शरद काळे डॉ. महेश बाहेकर, डॉ. सचिन झगडे, डॉ. अशोक भवटे आदिंची उपस्थिती होती.
वीररस कवि विनीत चौहान यांनी ऑपरेशन सिंदूरवर कविता प्रस्तुत केली. पाकिस्तान आणि चीनवर त्यांनी शब्द्रपहार केला. अर्थात ‌‘सापाला अर्धमेलं करून का सोडलं ?‌’, हा सवाल उपस्थित करायला ते विसरले नाहीत. हिंदुत्ववाद त्यांच्या रचनांमधून कुशल कुशलेन्द्र यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगींवर स्तुतीसुमने उधळली. कुशल यांची काव्यरचना कुशलतेने सत्ताधाऱ्यांची प्रशंसा करणारी होती. आभारप्रदर्शन कवि संमेलनाचे संयोजक ॲड. जितेंद्र कोठारी यांनी केले. विशेष म्हणजे ‌‘अपने अपने राम..‌’ या कार्यक्रमाच्या सादरीकरणासाठी पुढच्या तीन महिन्यांच्या आत बुलढाण्यात तीन दिवस पुन्हा येणार असल्याचे अभिवचन कुमार विश्वास यांनी दिले. पुन्हा एकदा ही ओजस्वी वाणी अनुभवयाला मिळेल, या भावनेने अनेकांचे चेहरे कुमार यांची ही घोषणा ऐकताच आनंदाने खुलले होते.
ओजस्वी, मधाळ आणि रसाळ वाणीतून डॉ.कुमार विश्वास रसिकांच्या हृदयाचा ठाव घेतात… मन, मेंदू आणि मस्तिष्क कधी त्यांच्या ताब्यात जातात, हे रसिकांना कळतही नाही.. मग विश्वास यांनी जिथे म्हटलं तिथे आणि दोन मिनीट म्हटलं तर लगातार दोन मिनीटांपर्यंत टाळ्या बरसतात.. त्यांनी हात उंचवायला सांगितलं तर श्रोते हात उंचावतात.. सोबत गीत म्हणतात.. ओळ संपली की, त्यांच्या सुचनेनुसार वाऽऽ वाऽऽऽ सुद्धा म्हणतात.. याव्यतिरीक्त रसिकांना जिथं आवडलं तिथं पडणाऱ्या टाळ्या वेगळ्या ! प्रारंभीच त्यांनी राष्ट्रमाता माँ जिजाऊंच्या या पावनभूमिचे आपल्या खास शैलीत वंदन केले. आपल्या काव्यपठनात त्यांनी अनेकदा माँ जिजाऊ, छत्रपति शिवाजी महाराज, संभाजी महाराज, पानीपतयुद्ध आणि मराठा बाण्याचा नम्र उल्लेख करीत उपस्थितांच्या टाळ्या घेतल्या. हिंदी आई आहे पण मराठी मावशी असून पुढच्या वेळी मराठी कवि मंचावर सोबत ठेवा, अशी विनंती भाईजींना केली. ‌‘आमचा कुणबा वाढला पाहीजे‌’, असे अभिमानाने सांगत भाषावाद करणाऱ्या मनसेवर अप्रत्यक्ष टिका केली. कुमार विश्वास यांच्या प्रचंड लोकप्रियतेचे कारण म्हणजे मार्मिकतेने सामाजिक प्रश्नांना रचनात्मक स्पर्श करण्याची त्यांची हातोटी ! ते जरी भाजपसोबत असले तरी कवि म्हणून भाजपवर टिकेची संधी ते सोडत नाहीत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला डिवचतांना समोर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि आमदार संजय गायकवाड आहेत, याची तमा त्यांनी बाळगली नाही. अर्थात कविचे विचार खिलाडूवृत्तीने स्विकारावे, ही त्यांची विनंती सर्वांना मान्यच असते. नेतेपण बाजूला ठेवत या नेत्यांनीही रसिकतेने कवि संमेलनाचा आस्वाद घेतला. ‌‘आमदारांना तरी निवडणूक जिंकण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात.. सांसदजी करना ही क्या पडता है, एक तरफ मोदी और दूसरी तरफ कमल का फोटो लगा लिया.. हो गया बस्स‌’, असा विनोदी फटकार त्यांनी लगावला. भाजपशिवाय एकनाथ शिंदेंकडे पर्याय तरी काय ? असा टोला त्यांनी हाणला. ‌‘ज्यांनी कोर्टात रामाचे अस्तित्व नाकारले, त्यांचेच अस्तित्व नष्ट होत चालले असल्याचा प्रखर व्यंग बाण त्यांनी काँग्रेसचे नांव न घेता मारला. ‌‘ईव्हीएमवर शंका उत्पन्न करणारा विनोद सादर करतांना ते म्हणाले, ‌‘काँग्रेसवाले कहते है, पंजा का बटन दबाओ… शिवसेना वाले कहते है, तिरकमान दबाओ.. बाकी पार्टीया अपने अपने चुनाव चिन्ह के बटन दबाने को कहती है, लेकिन भाजप है की, कहती है कोई भी बटन दबाओ, इतना आत्मविश्वास भाजपा को है‌’… त्यांचा हा विनोद संपूर्ण पेंडालमध्ये हशा पिकवून गेला.
सुदीप भोलांच्या ‌‘किस्मत किसान की..‌’ कवितेने पाणावले डोळे, गहिवरले श्रोते   
सुदीप भोला यांनी रसिकांची मने जिंकली. दर्जेदार विनोदी कवितांनी त्यांनी उपस्थितांना हसविले आणि शेतकऱ्यांच्या व्यथा मांडून गर्दीला गहिवरूनही सोडले. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या मनाला वेदना देतात म्हणून जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याप्रति कृतज्ञता म्हणून ‌‘किस्मत किसान की..‌’ ही कविता रचल्याचे भोला म्हणाले. या कवितेने अनेकांचे डोळे पाणावले.
देख कलेजा फट जाता है, आँखो से आँसू बहते है ! ऐसा ना हो कलम रो पडे, सच्चाई कहते कहते
बाली तक गिरवी रखी है, बेटी के अभिमान की, टूटी माला जैसे बिखरी, किस्मत आज किसान की
जो देता है खुशहाली, जिसके दम से हरियाली ! आज वही भी बरबाद खडा है, देखो उसकी बदहाली
बहोत बुरी हालत ईश्वर, धरती के भगवान की ! टूटी माला जैसे बिखरी, किस्मत आज किसान की
ऐसी आँधी चली की, घर का तिनका तिनका बिखर गया ! आखिर धरती माँ से उसका प्यारा बेटा बिछड गया अखाबारो की रद्दी बनकर, बिकी कथा बलिदान की ! टूटी माला जैसे बिखरी, किस्मत आज किसान की
इतना सुद चुकाया उसका, के अपनी सूद भूल गया! सावन के मौसम में झूला लगाके फाँसी झूल गया
अंबुवा की डाली पर देखो, लाश टंगी ईमान की ! टूटी माला जैसे बिखरी, किस्मत आज किसान की
डॉ.भुवन मोहिनी म्हणाल्या, ‌‘दूनिया हो गई रे बावरिया‌’
हसविणे सर्वात मोठी कला आहे. व्यंग, विनोदातून हास्यकवि ती किमया साधतात.. यासाठी त्यांना काही नाटकीय गोष्टीही प्रस्तुत कराव्या लागतात. बुलढाणा अर्बनकडून भाईजींच्या सूचनेनुसार ॲड. जितेंद्र कोठारी कवि संमेलनाच्या संयोजनासाठी सदर कविंच्या संपर्कात होते. या कविंमध्ये एकमात्र कवयित्री डॉ. भुवन मोहिनी होत्या. ॲड. कोठारी यांचा डॉ. भुवन यांच्या ‌‘मुलांचे मामा‌’ म्हणून मिश्कीलपणे उल्लेख केला गेला. हाच धागा इतर कविंनीही पकडला. त्यावरून कवि संमेलनात अधे-मध्ये हास्याचे कारंजे उडत गेले. या विनोदी कोटीला ॲड. कोठारींनीही वेळोवेळी नम्रपणे हसुन दाद दिली. डॉ. भुवन यांच्या ‌‘हम तुम्हारे हुए, तुम हमारे हुए‌’ आणि ‌‘दूनिया हो गई रे बावरिया..‌’ या दोन्ही कवितांनी जोरदार वाहवा मिळविली.
त्या म्हणतात की,
‌‘हो गयी हो गयी रे बावरिया, दुनिया हो गयी रे… एक मीरा थी प्यार की खातीर, पिया जहर का प्याला ! आज की मीरा मदिरा पीकर, गाती है उलाला… हो गयी हो गयी रे बावरिया, दुनिया हो गयी रे… की समझ नही आता है हमको राजनीति का फंडा ! एक रात मे दिलवा दे ये मुर्गे से भी अंडा !! हो गयी हो गयी रे बावरिया, दुनिया हो गयी रे… डीपी जिसकी देख देख कर होते रहे निहाल ! जिसको 16 साल की समझा निकली सत्तर साल !! हो गयी हो गयी रे बावरिया, दुनिया हो गयी रे ‌’
‌‘कब तक गीत सुनाऊँ राधे‌’ 
कृष्णाची आणि माझी व्यथा एकसारखीच असल्याचे सांगत कुमार विश्वास यांच्या कृष्ण आणि राधेमधील संवादावर आधारित कविता सादर केली. या कवितेने प्रेक्षकांना मुग्ध केले.
कब तक गीत सुनाऊं राधा कब तक गीत सुनाऊं ! मथुरा छूटी, छुटी द्वारिका, इंद्रप्रस्थ ठुकराऊं ! बंसी छूटी, गोकुल छूटा, कब तक चक्र उठाऊं !!
पिछले जन्म जानकी तुझ बिन जैसे तैसे बीता ! महासमर में रीता रीता, कब तक गाउ गीता !! और अभी कितने जन्मों तक तुझे दूर बिताऊं….
कब तक गीत सुनाऊं राधा कब तक गीत सुनाऊं !!
बचपन से प्रभुता का बोजा ढोते कटी जवानी ! हरपल षडयंत्रो में उलझी सांसे आनी जानी ! युगकी आंखे अमृत पीती रही मुझे तक तक कर अधर मधुर देखे
सबने पर पीड़ा न पहचानी !! इस पीडाको यार सुदामा कबतक महल दिखाऊ ! ‌’ कब तक गीत सुनाऊं राधा कब तक गीत सुनाऊं !!
दो माँ ओने लाड लड़ाया, दो चेहेरोने चाहा ! फिरभी भरी द्वारिकामे में खुदको लगा पराया ! मेरा क्या अपराध के मेरा गाँव गली घर छूटा !!
आँचलसे बिछडेको जग ने पीताम्बर पहनाया ! जग चाहे जाते जाते भी बंसी मधुर बजाऊ !! कब तक गीत सुनाऊं राधा कब तक गीत सुनाऊं !
जग भरके अपराध सदा हीं, अपने शीश उठाये ! रस का माखन सभने चाखा, चोर हमी कहलाये !! युगके दुर्योधनके जब जब अहंकार को कुचला !
दुनिया जीती, गांधारी के शाप हमीने खाये ! मुझको गले लगाओ या में ही गले लगाऊ, कब तक गीत सुनाऊं राधा कब तक गीत सुनाऊं

 

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत