अन्न व औषध प्रशासनाकडून साठ्यांचा शोध सुरू
बुलढाणा, 7 ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी) : कोल्ड्रीफ सिरपच्या विक्रीवर महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली आहे. समूह क्र. एस.आर. 13 च्या उत्पादनात काही विषारी पदार्थ आढळल्याने ही बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. इतर राज्यामध्ये कोल्ड्रीफ सिरपमुळे काही बालक दगावल्याचं समोर आले होते. कोल्ड्रीफ सिरप हे औषध मे. स्रेसन फार्मा तामिळनाडूमधील कांचीपुरममधील या कंपनीत तयार झाल्याची माहीती आहे. कोल्ड्रीफ सिरपमध्ये डायइथिलीयन ग्लायकोल हा विषारी पदार्थ आढळल्यानं इतर राज्यात बालकांचा मृत्यू झाला. त्यामुळे तामिळनाडूत उत्पादित होणाऱ्या कोल्ड्रीफ सिरप उत्पादनावर महाराष्ट्रात आता बंदी घालण्यात आली आहे. या कंपनीने उत्पादित केलेल सिरप महाराष्ट्रात कुठल्या भागात विक्रीसाठी आहे का? याचा शोध अन्न व औषध प्रशासन करत आहे. कोल्ड्रीफ सिरप हे मे 2025 ते एप्रिल 2027 या कालावधीतील औषध मेडिकलमध्ये असल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांकवर माहिती देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या औषधामधे डायइथिलीन ग्लायकोल नावाचा विषारी घटक असल्याचं स्पष्ट झालं आहे. तसेच मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये या कप सिरपच्या सेवनामुळे काही बालकांचा मृत्यू झाल्याची माहितीही समोर आली. त्यानंतर महाराष्ट्र सरकारकडून टोल फ्री क्रमांक नंबर 1800 222 365 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील विक्रेते वितरक आणि रुग्णालय यांना सदर औषधाच्या बॅचचा साठा आढळल्यास त्याचे वितरण न करता तो गोठवण्याच्या औषध निरीक्षक व सहाय्यक आयुक्त यांना सूचना देण्यात आल्या आहेत.