बुलढाणा, ८ ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी) ः बुलढाणा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक-२०२५ करिता महिला आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज नगर परिषदेच्या सभागृहात पार पडला. एकुण १५ प्रभागात ३० नगरसेवकांपैकी अर्ध्या ठिकाणी महिलांकडे नेतृत्व असणार आहे. यासाठी अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी तसेच सर्वसाधारण महिलांसाठी आज आरक्षण सोडतीचा कार्यक्रम झाला. नगर परिषदेच्या वरच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांच्या अधिपत्याखाली आरक्षण सोडत झाली. शाळकरी मुलींच्या हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आली. सोडतीनुसार आता प्रभागनिहाय आरक्षण याप्रमाणे राहील.
प्रभाग क्र. १ मध्ये गट अ-अनुसूचित जाती ः गट ब- सर्वसाधारण महिला,
प्रभाग क्र. २ गट अ-ओबीसी ः गट ब- सर्वसाधारण महिला,
प्रभाग क्र. ३ गट अ-ओबीसी महिला ः गट ब- सर्वसाधारण,
प्रभाग क्र. ४ गट अ-ओबीसी ः गट ब- सर्वसाधारण महिला,
प्रभाग क्र. ५ गट अ-अनुसूचित जाती महिला ः गट ब- सर्वसाधारण ,
प्रभाग क्र. ६ गट अ-अनुसूचित जाती महिला ः गट ब- सर्वसाधारण ,
प्रभाग क्र. ७ गट अ-अनुसूचित जमाती महिला ः गट ब- सर्वसाधारण ,
प्रभाग क्र. ८ गट अ-ओबीसी महिला ः गट ब- सर्वसाधारण,
प्रभाग क्र. ९ गट अ-अनुसूचित जाती ः गट ब- सर्वसाधारण महिला,
प्रभाग क्र. १० गट अ-सर्वसाधारण महिला ः गट ब- सर्वसाधारण,
प्रभाग क्र. ११ गट अ-ओबीसी ः गट ब- सर्वसाधारण महिला,
प्रभाग क्र. १२ गट अ-ओबीसी ः गट ब- सर्वसाधारण महिला,
प्रभाग क्र. १३ गट अ-अनुसूचित जाती महिला ः गट ब- सर्वसाधारण,
प्रभाग क्र. १४ गट अ-ओबीसी महिला ः गट ब- सर्वसाधारण,
प्रभाग क्र. १५ गट अ-ओबीसी महिला ः गट ब- सर्वसाधारण, 



