spot_img

‘मला गुलामांचे मत नको’ : उर्मिलाताई रोठे

नेमके काय म्हणे आहे उर्मिलाताईंचे…?

बुलढाणा, १ डिसेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) ः महाराष्ट्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार उर्मिलाताई रोठे यांची टॅगलाई ‘गुलामांचे  मत नको’ यामुळे चर्चांना उधाण आले आहे.   बुलढाणा नगर परिषदसाठी उद्या २ डिसेंबरला मतदान होणार आहे. तर ३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता पासून निवडणूकांचे कल हाती येणार आहे. बुलढाणा नगर परिषद निवडणूकीत प्रथम तिरंगी आणि मग चौरंगी लढतीचे संकेत मिळाले होते. शिवसेनेकडून बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी पुजाताई संजय गायकवाड यांना शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली. तर भाजपकडून माजी आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या पत्नी अर्पिताताई विजयराज शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. कॉंग्रेसकडून शहराध्यक्ष दत्ता काकस यांच्या पत्नी लक्ष्मीताई दत्ता काकस यांना महाविकास आघडीकडून संधी देण्यात आली. वंचीत बहुजन आघाडीकडून डॉ.संगीता अर्चित हिरोळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे बुलढाण्यात चौरंगी लढत होणार हे जवळपास निश्‍चित झाले होते. पण डॉ.संगीता हिरोळे यांनी राजकीय समीकरण लक्षात घेता आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. एकीकडे तिरंगी लढतीमध्ये तिन्ही उमेदवारांचे पती यांना नगर पालिका निवडणूकांमध्ये प्रर्दिर्घ असा अनुभव आहे. असे असतांना सुध्दा त्यांनी बॅनर वर अनुक्रमांक टाकला नाही. काही माजी नगरसेवक अपक्ष लढत आहे. त्यांच्याही दोन तीन टर्म असतांना त्यांनी अपक्ष चिन्ह व अनुक्रमांक बॅनर, प्रचार यंत्रणेत वापरले नाही. पण महाराष्ट्र विकास आघाडीच्या उमेदवार उर्मिला सतिषचंद्र रोठे यांनी तर अर्ज छाननी नंतर लगेच अनुक्रमांक आणि चिन्ह घेऊन त्याा मतदारांपर्यंत पोहचल्यात. विशेष म्हणजे त्यांना तो अनुक्रमांक आणि चिन्ह सुध्दा निवडणूक आयोगाने दिल्यामुळे त्यांना बळ मिळाले आहे.
कोणत्याही मोठ्या नेत्याची सभा न घेता उर्मिलाताई रोठे यांच्या होर्डिंग्ज पोस्टर वरील सामान्य माणसाच्या ताकतीला कमी लेखू नका या टॅगलाईन खाली मला गुलामांचे मत नकोय. लोकशाहीला मानणार्या आणि हुकूमशाहीला नाकारणार्या मतदारांचे मत मला हवे आहे. होर्डिंग चर्चेचा विषय ठरत आहे. बुलढाणा शहरातील झालेली नियमबाह्य प्रभाग रचना,बुथ रचना यावरील आझाद हिंदने दिलेला सुप्रीम कोर्टापर्यंत चा लढा, शिस्तबद्ध परंतु नागरिकांना वेठीस न धरणारी प्रचार यंत्रणा जनसामान्यांना आपलीसी करणारी ठरत आहे.
ऍड.सतिषचंद्र रोठे यांचा जनसंपर्क असल्यामुळे त्यांना वारकरी आणि कामगार संघटनांनी पाठिंबा दिला आहे. तसेच वंचीत बहुजन आघाडीचे निवडणूक चिन्ह सिलेंडर ही उर्मिलाताई रोठे यांना मिळाले आहे. त्याचा त्यांना फायदा होतो का हे बुधवारीच स्पष्ट होईल. त्यामुळे तिरंगी वाटणारी लढत चौरंगी कडे सध्यातरी जाताना दिसत आहे.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत