ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे म्हणतात, रॅकेटमध्ये किमान 100 जण
बुलढाणा, 3 डिसेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : बुलढाणा नगर परिषदेसाठी काल झालेल्या मतदानाच्या वेळी पकडण्यात आलेल्या बोगस मतदाराचे प्रकरण संपूर्ण राज्यभर गाजले आहे. बोगस मतदान करणारे आणि त्यांना पाठबळ देणारे समोर आलेले सर्व प्यादे आहेत. त्यांना पाठबळ देणारा आकावरही कारवाई होणे क्रमप्राप्त आहे, अशी मागणी आझाद हिंद संघटनेचे अध्यक्ष तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. उर्मिलाताई रोठे यांचे पती ॲड. सतीशचंद्र रोठे यांनी केली आहे. मतदान प्रक्रियेत व्यत्यय निर्माण करणे, बोगस मतदान करणे ही कारवाई प्राथमिक टप्प्यातील आहे. वास्तविक पाहता नियमानुसार सामूहिक रित्या घटकाला स्थान रचणे, बोगस मतदानाचे रॅकेट चालविणे, प्रशासकीय कामात अडथळा निर्माण करणे, कर्तव्यावरील पोलिसांचा हात पकडून ओढताण करणे, आदर्श आचारसंहितेचे आदर्श कलम असे इतरही गुन्हे नियमप्रमाणे दाखल होऊ शकतील..! प्रामुख्याने बोगस मतदार बुलढाणा करण्यासाठी गेम प्लॅन खेळणारा आका कोन.?, असेही ऍड. रोठे यांचे म्हणणे आहे. ते पुढे म्हणतात की, संपूर्ण बोगस मतदानच्या रॅकेटमध्ये सहभागी झालेल्यांची संख्या 100 च्या वरती आहे. रॅकेटचा तपास करून त्यांच्यावर ही कारवाई होणे क्रम प्राप्त आहे. निवडणुकीच्या दिवशी सकाळी सात वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी घाटाखालील थड, इब्राहिमपूर,कोथळी, आव्हा, लिहा, युनुसपूर, पिंपळगाव देवी, खानदेश बॉण्ड्री वरील गावे, हैदराबाद येथील बोगस मतदार मोठ्या प्रमाणात बुलढाणा दाखल होत असल्याची माहिती सुद्धा दिली होती, असे ॲडव्होकेट रोठे म्हणतात.
बुलढाणा शहरातील प्रामुख्याने भोंडे शाळा, आणि इतर बुथवर डुप्लिकेट आधार कार्ड घेऊन बोगस मतदान होण्याची पूर्वकल्पना पंधरा दिवसापूर्वी पुराव्यासह आम्ही निवडणूक आयोग, निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिली होती. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता कर्तव्यदक्ष निवडणूक निर्णय अधिकारी शरद पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलेश तांबे यांनी आझाद हिंदला दिलेला शब्द पूर्ण करून दाखवला. त्यानुसार बुलढाण्यातील जुना गाव, भीलवाडा, परिसरातील प्रमुख सहा बुथ बंद करण्यात आले होते.त्यामुळेच बोगस मतदारांना इतर बुथवर जावे लागले. प्रभाग रचना,बुथ रचना फोडण्याचे आणि या प्रभागातील मतदार त्या प्रभागात टाकण्याचं एकमेव कारण म्हणजे बोगस मतदारांना संधी मिळावी हेच होते. त्यावर आम्ही मागील तीन महिन्यापासून गल्लीपासून दिल्लीतील सुप्रीम कोर्टापर्यंत लढा दिलेला आहे. बुलढाण्यातील सुज्ञ, सुशिक्षित, नोकरदार वर्गाला प्रत्यक्ष भेटून संपूर्ण माहिती आम्ही दिलेली होती. बोगस मतदार रॅकेट प्रकरणाबाबत लवकरच जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांना निवेदन देऊन प्रकरणाच्या खोलपर्यंत तपास करण्यासाठी निवेदन देऊ, असे ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे यांनी सांगितले आहे.



