बुलढाणा, ५ डिसेंबर (गुड इव्हिनिग सिटी) ः मोताळा तालुक्यातील सारोळा पीर शिवारात मृत बिबट्या आढळला आहे. आज ५ डिसेंबर रोजी सारोळा पीर शिवारातील मका पिकाच्या शेतात बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला आहे. याप्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर वन खात्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. वन पथकाच्या टिमने मृत बिबट्याचे नमुने ताब्यात घेऊन पुढील तपासणीसाठी ते पाठविण्यात येणार आहे. बिबट्याचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला आहे की, विष प्रयोगामुळे झाला आहे. याबाबतची माहिती पोस्टमार्टम रिपोर्ट नंतरच सत्य समोर येईल. परंतू या घटनेमुळे त्या परिसरात खळबळ उडाली होती.