spot_img

सहकारी संस्थांच्या निवडणुकीला पुन्हा ब्रेक

बुलढाणा, ५ डिसेंबर (गुड इव्हिनिग सिटी)  ः राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सहकाराच्या आखाड्यातील द्वंद पुन्हा थंडावले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने याविषयीचे शासकीय परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे सहकार पंढरीत आता राजकीय बेलभांडारा उधळल्या जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तर सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका मात्र वेळेतच होणार आहेत.  राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने यापूर्वी घेतला होता. राज्यात ऑगस्ट महिन्यात पावसानं मोठं थैमान घातलं होतं. अतिवृष्टीमुळे आणि मुसळधार पावसामुळे राज्यातील २० हून अधिक जिल्हे प्रभावित झाले होते. त्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ब्रेक लागला होता. महाराष्ट्र सहकारी संस्था, समितीची निवडणूक, नियम २०१४ मधील नियम ४ अंतर्गत अ आणि ब वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. ३० सप्टेंबर २०२५ रोजीपर्यंत या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. तर ज्या संस्थांच्या निवडणुका घेण्याचे हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाने आदेश दिले होते. त्या सहकारी संस्थांच्या निवडणुका वगळून हे आदेश देण्यात आले होते. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा बिगुल वाजला आहे. नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकांचा एक टप्पा पूर्ण झाला असून आता २० डिसेंबर रोजी दुसरा टप्पा होणार आहे. त्यानंतर २१ डिसेंबर रोजी निकाल लागले. तर महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका कधी होतील याविषयी राज्य निवडणूक आयोगाने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण सध्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा हंगाम सुरू आहे. तोच दाखला देत सहकारी संस्थांच्या निवडणुकीला पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत