बुलढाणा, 6 डिसेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : बुलढाणा पोलीस वसाहती मध्ये पाच ठिकाणी चोरी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आज 6 डिसेंबर रोजी बुलढाणा शहरातील चिखली रोडवरील देवीच्या मंदिर परिसरात असलेल्या पोलिस वसाहतीत चोरीची घटना समोर आली आहे. यामध्ये पैसे व दागिन्यांचा समावेश आहे. चोरांनी जवळपास वीस लाखांची चोरी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यामध्ये एएसआय वारे, पोलिस कॉन्स्टेबल रुबीना शेख यांच्यासह इतरांच्या घरी चोरी झाली आहे.
पोलिस अधीक्षक कार्यालय हे तेथून हाकेच्या अंतरावर आहे. त्या नजीकच ग्रामीण पोलीस स्टेशन असल्यामुळे पोलिसांची वर्दळ असणाऱ्या परिसरात अशी घटना घडली आहे. या घटनेमुळे बुलढाणा शहरात खळबळ उडाली आहे. पोलिस व फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बुलढाणा शहर पोलिस करीत आहे.



