निवडणूक अधिकारी शरद पाटील यांचे स्पष्टीकरण
बुलढाणा, 10 डिसेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : गुड इव्हिनिंग सिटीच्या सिटी प्लस चॅनल वर काही वेळापूर्वीच स्ट्राँग रूम परिसरातील कॅमेरे बंद अशा प्रकारची बातमी प्रसारित केली आहे. माजी आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी या बातमीची तात्काळ दखल घेतली आहे. त्यांनी यासंदर्भात उपविभागीय अधिकारी बुलढाणा तथा उप जिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील यांच्याशी संपर्क साधून याबाबत माहिती जाणून घेतली. शरद पाटील यांनी सांगितले की, अशा प्रकारचे कुठेच काही नाही. सर्व सुरक्षा व्यवस्था प्रशासनाकडून तैनात करण्यात आली आहे. उद्या याबाबींचे निरसन करण्यासाठी पत्रकारांना बोलविण्यात येणार आहे. गरज पडल्यास त्यांना स्ट्राँग रूम जवळची व्यवस्था दाखविण्यात येईल अशी माहिती शरद पाटील यांनी दिली आहे.



