बुलढाणा, 11 डिसेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : थोड्या वेळापूर्वी तांदूळवाडी फाट्या नजीक झालेल्या अपघातात सेवानिवृत्त पोलीस अधिकारी जागीच गतप्राण झाल्याची माहिती मिळाली आहे. बैलगाडीला धडकून टू व्हीलर वर स्वार व्यक्ती रस्त्यावर फेकल्या गेली आणि त्यानंतर मागून आलेली भरधाव कार त्या व्यक्तीच्या अंगावरून गेल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचे कळते. मृतक व्यक्तीचे नाव नामदेव सोर असून ते एका वर्षांपूर्वी पोलीस प्रशासनातून सेवानिवृत्त झाले आहेत. मूळचे घाटनांद्रा येथील असणारे नामदेव विठोबा सोर (वय 59) हे पीएसआय होते. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. धडक दिल्यानंतर चार चाकी वाहन घटनास्थळावरून फरार झाल्याने सदर प्रकार हिट अँड रन असा झाला.
@goodeveningcity
11 Dec 2025 07:15
◾◾◾◾◾◾◾



