spot_img

सावधान ! सागवन परिसरात आढळला बिबट्या

बुलढाणा, १२ डिसेंबर (गुड इव्हिनिंग सिटी): सागवन परिसरात काल सायंकाळी बिबट्‌या आढळून आला आहे. राज्यात दिवसेंदिवस बिबट्‌यांच्या संख्येत वाढ होत आहे. बिबट्याच्या मुद्‌द्यावरून सध्या नागपूरात सुरु असलेल्या राज्याच्या हिवाळी अधिवेशनात नागपूरमध्ये थंडी असताना सुध्दा बिबट्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. राज्यात 5 हजार बिबटे असल्याची प्राथमिक माहिती आहे. परंतु यापेक्षा सुध्दा जास्त बिबटे असल्याची बाब विविध घटनांमधून समोर येत आहे.
बिबट्‌यांना जंगलात शिकारीसाठी प्राणी मिळत नसल्याने बिबटे नागरी वस्तीकडे धाव घेत आहे. बुलढाणा शहरालगत असलेल्या सागवन परिसरात काल १२ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास बिबट्या आढळून आल्याची घटना घडली आहे. सागवन येथील शेतकरी अशोक ग्यानबा जाधव यांच्या शेतात बिबट्‌या आढळला आहे. काल सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास बिबट्‌या आढळल्यामुळे सागवन परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा बिबट्या आज 13 डिसेंबर रोजी सकाळी अशोक प्रल्हाद काळवाघे यांच्या शेताकडुन  विजय मारवाडी यांच्या शेताकडे गेला आहे. बिबट्याच्या समवेत दोन बछडे आहेत, तरी शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. यावर्षी तूर व मका पिकाच्या क्षेत्रात वाढ झाल्यामुळे बिबट्‌यांना राहण्यासाठी जागा मिळाली आहे रात्रीला शेतात रब्बीच्या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी जात असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी जात असतांना जीव मुठीत धरून जावे लागत आहे.

 

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत