बुलढाणा, 14 डिसेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : धामणगाव बढे परिसरात 70 ते 80 मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. धामणगाव बढे परिसरातील रिधोरा खंडोपंत येथे शहाजी बोरसे व मारोती दामा मोरे यांच्या शेताजवळ मेंढपाळ नाना चत्रु गोरे रा.सहस्रीमुळी यांच्या मालकीच्या 70 ते 80 मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर 10 ते 15 मेंढ्या गंभीर आहे. या मेंढ्यांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. परंतु कशामुळे मेंढ्या मृत्यू पावल्या याबाबतची माहिती तपासणी नंतरच समोर येईल. या घटनेमुळे मेंढपाळाचे लाखो रुपयांच्या वर नुकसान झाले आहे. संबंधित विभागाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.