spot_img

बुलढाण्यातील स्ट्रॉंग रूम समोरील एलईडीत बिघाड..?

निवडणूक निर्णय अधिकारी शरद पाटील यांचे स्पष्टीकरण

बुलढाणा, १६ डिसेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) ः बुलढाण्यातील डिस्प्ले स्टोरेज तांत्रिक कारणास्तव बिघाड झाल्याची घटना समोर येत असून या अनुषंगाने उमेदवार प्रतिनिधी स्ट्रॉंग रूम समोरील पहारा आंदोलक ऍड. सतीशचंद्र रोठे पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी शरद पाटील यांना माहिती देत चौकशी करण्याची मागणी आज १६ डिसेंबरला सकाळी केली होती.
आज सकाळी जवळपास ११ वाजेपासून स्ट्रॉंग रूम समोरील ११ सीसीटीव्ही असलेला यापूर्वी लावलेला डिस्प्ले वर डाटा स्टोरेज फुल दाखवीत सीसीटीव्ही लाईव्ह दाखविण्याचे बंद झाले होते. या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आदेशान्वये त्वरित संबंधित संगणक तंत्रज्ञ आणि सीसीटीव्ही कंत्राटदारांना माहिती देत दुरुस्तीचे आदेश देण्यात आले आहे. यावेळी पहारा आंदोलन सतीश चंद्र रोटे पाटील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती काटकर यांच्या समक्ष सदर डिस्प्ले टीव्ही बदलण्यात आला आहे.
संगणक तंत्रज्ञ विशाल हिवाळे यांच्याकडून माहिती घेतली असता सदर डिस्प्ले स्टोरेज फुल झाल्यामुळे तसेच डिस्प्ले टीव्हीचा बिघाड झाल्यामुळे सदर बाब घडली आहे. अशी माहिती दिली परंतु महाराष्ट्रातील एकाही डिस्प्ले स्टोरेज चा डाटा अद्याप पर्यंत फुल दाखवण्यात आलेला नाही असे ऍड.रोठे यांनी सांगितले.

गुड इव्हिनिंग सिटीला प्रतिक्रिया देतांना निवडणूक अधिकारी शरद पाटील यांनी सांगितले की, एलईडी स्क्रीन मधील मेमरी 3 जीबी ची आहे. एलईडी स्क्रीनचा स्वतःचा डाटा फुल झाल्यावर stroage Full असे मेसेजेस स्क्रीन वर डिस्प्ले होतात. त्याचा डाटा स्टोरेज मध्ये सुरक्षीत सेव्ह होत आहे. त्या एलईडी स्टोरेजचा आणि सीसीटीव्ही स्टोरेजचा संबंध येत नाही. सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा स्टोरेज डाटा फुल झालेला नाही. ॲड.रोठे यांनी याबाबत माहिती दिल्यानंतर स्क्रीन तात्काळ बदलण्यात आली आहे. ॲड.रोठे यांनी प्रशासनाला याबाबत माहिती देणे अपेक्षित आहे. परंतु सोशल मीडियावर काही बाबी टाकतात. सत्यता पडताळूनच मग याबाबत माहिती देणे अपेक्षित आहे. यामुळे संभ्रम निर्माण होत आहे. सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे स्टोरेज 21 डिसेंबर पर्यंत सुरक्षीत राहिलं एवढा डाटा शिल्लक आहे.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत