spot_img

राष्ट्रसंत श्री ललितप्रभजी १९ डिसेंबर रोजी बुलढाण्यात… सोबत डॉ. मुनि श्री शान्तिप्रियजी महाराजांचीही उपस्थिती

‘जगण्याची कला’ विषयावर प्रवचन ; सर्वच नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

बुलढाणा, १७ डिसेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : बुलडाणा नगरीत राष्ट्रसंत परमपूजनीय गुरुदेव श्री ललितप्रभ जी व डॉ. मुनि श्री शान्तिप्रिय जी महाराज साहेब यांचा मंगल प्रवेश शुक्रवार, दिनांक १९ डिसेंबर रोजी अत्यंत भक्तिभावात व उत्साहात संपन्न होणार आहे. या पावन प्रसंगी शहरात भव्य शोभा यात्रा (वरघोडा) आयोजित करण्यात आली आहे. ही शोभा यात्रा दुपारी २ वाजता गर्दे हॉल चौक येथून प्रारंभ होणार असून, कारंजा चौक, जनता चौक, मेन रोड, जयस्तंभ चौक मार्गे मलकापूर रोडवरील दादावाडी मंदिर येथे समारोप होणार आहे. या मंगल प्रसंगी श्रावक-श्राविका, नवयुवक, बालगोपाल यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शोभा यात्रेच्या मार्गावर महापुरुषांच्या स्वागतार्थ बॅनर लावावेत, तसेच भगिनींनी लाल चुनरी व बंधूंनी श्वेत वस्त्र व पारंपरिक वेशभूषेत सहभागी व्हावे, अशी विनंती करण्यात आली आहे. फक्त भारतच नव्हे तर संपूर्ण विश्वाला जीवन जगण्याची कला शिकवणार्‍या या महान संतांचा बुलडाणा शहरात होणारा प्रवेश, स्वागत व प्रवचन हे सर्व कार्यक्रम संस्मरणीय व्हावेत, या उद्देशाने सर्वांनी तन-मन-धनाने योगदान देत कुटुंबीय व इष्टमित्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन श्री सद्भावना सेवा समिती व सकल जैन संघ, बुलडाणा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत