बुलडाणा, १८ डिसेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : पत्रकारांची सर्वात जुनी संघटना आणि मातृसंस्था म्हणून ओळखल्या जाणारे मराठी पत्रकार संघटना या संघटनेमार्फत दरवर्षी प्रमाणे विविध उपक्रम राबविल्या जातात. यावर्षी सुद्धा ६ जानेवारी पत्रकार दिनानिमित्त बुलडाणा पत्रकार भवन येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.आज दि १८ डिसेंबर रोजी पत्रकार भवन येथे बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ व इतर पत्रकार संघटनांच्या वतीने संयुक्त बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या शिबिरामध्ये पत्रकार व त्यांचे कुटुंब या सर्वांचे आरोग्य तपासण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये हृदयरोग नेत्रतज्ञ पॅथॉलॉजी अशा विविध आजारांवर तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर औषधोपचार सुद्धा करण्यात येणार आहे. तसेच पत्रकारांच्या सुरक्षा कवच म्हणून ओळखल्या जाणार्या विमा सुद्धा यावर्षी काढण्यात येणार आहे. गेल्या वर्षी आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकारांचा सुरक्षा विमा कवच काढला होता त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा पत्रकारांचा सुरक्षा विमा कवच काढण्यात येणार आहे.
या बैठकीला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजीतसिंग राजपूत, डीजिटल मिडीया परिषदेेचे जिल्हाध्यक्ष गणेश सोळंकी, राजेंद्र काळे, चंद्रकांत बर्दे, प्रा.सुभाष लहाने, जितेंद्र कायस्थ, गणेश निकम, राजेश डिडोळकर, वसिम शेख, युवराज वाघ, ब्रम्हानंद जाधव, पृथ्वीराज चव्हाण, शिवाजी मामनकर, ईसार देशमुख, गणेश सोनुने, संजय काळे, निनाजी भगत, सुरेखाताई सावळे, शरद गावंडे,रविंद्र वाघ, राम हिंगे, डॉ.भागवत वसे, सुनिल मोरे, बबन फेपाळे, दिपक मोरे, अजय राजगुरे, रहेमत अली शहा, शौकत शहा यांच्यासह जिल्हा पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य पत्रकार परिषद, असोसिएशन ऑफ स्मॉल पेपर संघटनेचे पदाधिकार्यांची यावेळी उपस्थिती होती



