spot_img

कुत्र्यांच्या मालकांमध्ये लोकप्रतिनिधी, डॉक्टर, ठेकेदार, उद्योजकांचा समावेश

बुलढाणा, २१ मार्च (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत) भारत सरकारकडून २३ परदेशी कुत्र्यांच्या प्रजातीवर घरात पाळण्यास बंदी घालण्यात आली आहे. एव्हढे असूनही काही मोठ्या घरांमध्ये केनकार्यों, अकिता आणि पिटबुल सारखे महाभयंकर खूंखार श्वान कायद्याचे उल्लंघन करीत पाळले जात आहे. गंभीर बाब म्हणजे परेदशी कुत्र्यांकडून मनुष्यावर हल्ल्याचे वाढते प्रमाण लक्षात घेता केंद्राने घातलेली बंदी जिल्हा प्रशासन किंवा नगर प्रशासनाकडून दुर्लक्षीत केली गेली असून काहींनी प्रशासनाविरोधात कारवाईसाठी केंद्राकडे तक्रारीची तयारीही केली असल्याचे समजते. दरवर्षी भारतात कुत्र्यांच्या हल्ल्यात जख्मी होणाऱ्या प्रकरणांची संख्या जवळपास तीन लाखांच्या घरात आहे. काही प्रकरणांमध्ये मनुष्यहानि झाली आहे. तर लखनौमध्ये दोन वर्षापूर्वी घडलेले प्रकरण खूपच धक्कादायक होते. घरात पाळण्यासाठी आणलेल्या पीटबुल कुत्र्याने सुशिला त्रिपाठी नावाच्या मालकिणीला चक्क ठार केले होते. अर्थात अशी अनेक प्रकरणे समोर आल्याने भारत सरकारने मोठा निर्णय घेत परदेशी ब्रिड्सच्या २३ खतरनाक परदेशी कुत्र्यांवर घरात पाळण्यास बंदी घातली आहे. यात पिटबूल, रॉटविलर, टेरियर, वूल्फ डॉग सारख्या परदेशी श्वानांचा समावेश आहे. अनेक भारतीय घरात या ब्रिडचे कुत्रे ठेवले जातात. पण आता केंद्र सरकारच्या निर्णयानंतर हे श्वान ठेवता येणार नाहीत. यासोबतच या जातीच्या श्वानांच्या प्रजनानावर बंदी घालण्याचीही सूचना करण्यात आली आहे. या जातीच्या श्वानांना परवाने दिले जाणार नाहीत, असे पशुसंवर्धन मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. या जातीच्या श्वानांचा वापर युद्धात केला जातो. त्यामुळे अशा श्वानांना घरी ठेवणं धोकादायक ठरु शकतं, असं केंद्र सरकारने म्हटलंय. पशुसंवर्धन मंत्रालयाचे सचिव डॉ. ओपी चौधरी यांनी सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलत पिटबूल आणि माणसाला धोकादायक ठरु शकतील अशा श्वानांच्या Dogs) पालनास परवाना न देण्याच्या सूचना करून एक ( आठवडा उलटला आहे. परंतु नगर प्रशासनाकडून अथवा असणार आहे. या परदेशी श्वानांवर बंदी : पिटबुल टेरियर, तोसा इनु, अमेरिकन स्टेफोर्डशायर टेरियर, फिला ब्रासीलिरियो, डोगो अर्जेंटिनो, अमेरिकन बुलडॉग, बोएसबोएल, कनगाल, सेंट्रल एशियन शेफर्ड, काकेशियन शेफर्ड, साउथ रशियन शेफर्ड, टोनजॅक, सरप्लानिनॅक, जापानी तोसा ऐंड अकिता, मास्टिफ्स, रॉटलवियर, टेरियर, रोडेशियन रिजबॅक, वोल्फ डॉग्स, कनारियो, अकबाश, मॉस्को गार्ड, केन कार्सी. जिल्हा प्रशासनाकडून यासंदर्भात काही एक कार्यवाही केली गेली नाही. पाळीव कुत्र्यांसंदर्भात कुठलीही प्राणीगणना प्रशासनाकडे आहे की नाही, याविषयी सुद्धा शंका वाटते. धक्कादायक बाब म्हणजे एका लोकप्रतिनिधीकडे केनकार्मो श्वान आहे. जो बंदी घातलेल्या कुत्र्यांमध्ये समाविष्ट आहे. तर एका डॉक्टरकडे केनकासों आणि अकिता असे दोन-दोन खतरनाक कुत्रे आहेत. घर आणि व्यक्तीगत सुरक्षा म्हणून अशी खतरनाक कुत्री अनेक जण पाळतात. परंतु ही परदेशी कुत्री मनुष्यासाठी हानिकारक आहेत. काही ठेकेदारांकडे पिटबुल आहे. बुलढाण्यात जवळपास डझनभर लोकांनी रॉटलवियर कुत्रा पाळलेला आहे. त्यावरही बंदी आहे. पाळीव कुत्र्यांमध्ये मालकांचा प्रचंड जीव असतो. कदाचित बंदी घातलेली कुत्रे हानिकारक नसतील. परंतु केंद्राने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे प्रशासनाला बंधनकारक असणार आहे

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत