आ. गायकवाड यांनी पुन्हा उडविली विजयराज शिंदे यांची खिल्ली
बुलढाणा, 7 एप्रिल (गुड इव्हिनिंग सिटी ) : उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून विजयराज शिंदे यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून केलेल्या चर्चेची दखल आमदार संजय गायकवाड यांनी घेतली खरी परंतु विजयराज शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडून फोन करून घेतला असेल, अशी खोचक टीका करत आ. गायकवाड यांनी पुन्हा एकदा विजयराज शिंदे यांची खिल्ली उडविली आहे आपल्या चॅलेंजचा पुनरुच्चार करीत आमदार गायकवाड म्हणाले की, विजयराज शिंदे यांनी उभे राहून दाखवावेच, ते हजार किंवा पाचशे मतांच्या पुढे जाणार नाहीत… तसेही शिंदे यांनी आतापर्यंत खासदारकीला उभे असणाऱ्या शिवसेनेचे उमेदवाराचे कधीच काम केलेले नाही… आनंदराव अडसुळ असो की, प्रतापराव जाधव, शिंदे यांनी विरोधातच काम केलेले आहे… आम्ही कुणीही किंवा प्रतापराव यांनी सुद्धा विजयराज शिंदे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची कुठलीही विनंती केलेली नाही… तेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना फोन करून करून स्वतःच चर्चा घडवून आणत असल्याचा आरोपही आमदार गायकवाड यांनी केला आहे. “अर्ज मागे घेतला तरी ते आमचं काम करणार नाही त्यामुळे अर्ज कायम ठेवून त्यांनी निवडणूक लढवावी, ते हजार किंवा पाचशे मतांच्या पुढे जाणार नाही”, अशी मिश्किल आणि खोचक टिका गायकवाड यांनी केली. दरम्यान विचारात शिंदे यांची नागपूर येथे भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याशी चर्चा संपन्न झाली असल्याचे समजते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे त्यांनी वरिष्ठांना कळविले आहे.