spot_img

“सल्ला देण्याची तुमची औकात नाही”

आ. गायकवाड यांना विजयराज शिंदे यांचे कडक प्रत्युत्तर 

 बुलढाणा, 8 एप्रिल (गुड इव्हिनिंग सिटी/रणजितसिंग राजपूत) : उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून शिंदे गटाचे नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी विजयराज शिंदे यांचे औकात काढली होती. तर आमदार संजय गायकवाड यांनी सुद्धा विजयराज शिंदे हजार-पाचशे मतांच्या पुढे जाणार नाहीत अशी खोचक टीका केली होती. या टिकेला नागपूरहून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन बुलढाणा येथे परतलेल्या माजी आमदार विजयराज शिंदे यांनी गुड इव्हिनिंग सिटीच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. 

विजयराज शिंदे तीन वेळा आमदार म्हणून निवडून आला आहे… मला सल्ला देण्यासाठी तुम्हाला चौथ्यांदा निवडून यावं लागेल… तुमच्या राजकीय अपरिपक्वतेमुळे आणि राजकीय अज्ञानामुळे तुमचा अर्ज बाद झाला आहे… त्यामुळे ज्यांचा उमेदवारी अर्ज बाद होतो त्यांनी दुसऱ्याला सल्ला देण्याची गरज नाही”,  नेमक्या याच शब्दांत भाजप नेते तसेच माजी आमदार विजयराज शिंदे यांनी आमदार संजय गायकवाड यांना प्रत्युत्तर दिले आहे. शिंदे गट आणि भाजप दोन्हीमध्ये समन्वय राहावा म्हणून मुख्यमंत्री स्तरापासून ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत प्रयत्न सुरू आहेत. परंतु संजय गायकवाड आणि विजयराज शिंदे या दोघांमध्ये असलेले राजकीय शत्रूत्व महायुती धर्माची शिस्त मोडणारे ठरत असल्याचे चित्र आहे. एकमेकांचे औकात काढेपर्यंत पोहोचलेले हे वाकयुद्ध प्रतापराव जाधव यांच्यासाठी नुकसानदायक ठरू शकते, यात शंका नाही. विशेष म्हणजे विजयराज शिंदे यांनी आपल्या घरी दुपारी एक वाजेच्या दरम्यान कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याबद्दल कार्यकर्त्यांशी चर्चा करून ते निर्णय घेणार आहेत. अर्थात विजयराज शिंदे यांची समजूत घालण्यात भाजप पक्षश्रेष्ठी यशस्वी झाले आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे शिंदे आज आपला अर्ज नक्की मागे घेतील, अशीच खात्रीलायक माहिती गुड इव्हिनिंग सिटीकडे आहे. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत