जुनी पेन्शन योजना लागू करा
बुलढाणा, १४ सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी): केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करण्यात आली आहे, जी पेन्शन योजना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जशाच्या तसे लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे परंतु सदर पेन्शन योजनेला कर्मचाऱ्यांचा विरोध दर्शवण्याकरिता व जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्यासाठी शिर्डी येथे पेन्शन राज्य महा अधिवेशन आयोजित करण्यात आला आहे . केंद्र सरकारने लागू केलेली युनिफाईड पेन्शन योजना मध्ये शेवटच्या मूळ वेतनाच्या ५०% रक्कम पेन्शन म्हणून देण्याची तरतूद आहे परंतु सदर पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान कायम ठेवण्यात आल्याने, कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन (जश्रव शिपीळेप) प्रमाणे लाभ मिळणार नसल्याने सदर पेन्शन योजनेला कर्मचाऱ्यांकडून विरोध दर्शवला जात आहे. तर राज्य सरकारकडून राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS), युनिफाईड पेन्शन योजना व राज्य सरकारने तयार केलेली सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना या तिन्ही पेन्शन योजनेचा अभ्यास करून ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना सर्वाधिक लाभ होईल, अशी पेन्शन योजना राज्य कर्मचाऱ्यांना लागू केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री यांनी कर्मचारी संघटनाच्या बैठकीत देण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने सदर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना राष्ट्रीय पेन्शन योजना व युनिफाईड पेन्शन योजना या सर्व प्रकारच्या योजनाला विरोध दर्शवीत, जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मोठी मागणी केली जात आहे. याकरिता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांच्या वतीने दिनांक १५ सप्टेंबर २०२४ रोजी शिर्डी येथे पेन्शन राज्य महा- अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे तरी सदर पेन्शन महा- अधिवेशनास राज्यातील कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आव्हान सदर संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे