spot_img

येळगाव शिवारात डीपीवरून अवैध कनेक्शन घेणार्‍यांचे केबल जप्त

 

बुलढाणा,  १८ ऑक्टोबर (गुड इव्हीनींग सिटी) :
शेतीला पाणी देण्यासाठी महावितरणच्या डीपीवरून थेट अवैधरित्या केबल टाकून वीज चोरोछिपे वापरणाऱ्यांविरोधात महावितरणने कडक पावले उचलली आहेत. बुलढाणा तालुक्यातील येळगाव शिवारात विहिरीतून पाण्याचा उपसा करण्यासाठी सुरू असलेला हा अवैध प्रकार महावितरणच्या पथकाने उघडकीस आणला असून, संबंधित तिन्ही ठिकाणचे केबल जप्त करण्यात आले आहेत.
येळगाव शिवारात काही शेतकऱ्यांनी शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी महावितरणच्या वीज वाहिनीची कोणतीही परवानगी न घेता किंवा अधिकृत मीटर न बसवता थेट डीपीवरून अकोडा टाकून अवैधरित्या वीज कनेक्शन घेतले होते. या अनधिकृत कनेक्शनच्या माध्यमातून तीन शेतकरी आपल्या शेतपंपाद्वारे विहिरीतून पाण्याचा उपसा करत होते. ही बाब महावितरणच्या सतर्क कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर महावितरणच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि संबंधित ठिकाणांहून अवैधपणे टाकलेले वीज केबल जप्त करण्याची कारवाई केली. यावेळी महावितरणचे जाधव, रिंढे बुलढाणा नगरपालिकेचे अभियंता राजेश गायकवाड, सुभाष आराख, महेंद्र घोरपडे यांच्या समवेत कारवाई केली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत