spot_img

गिरडा विकासाच्या नव्या वाटेवर… “श्री” संस्थानला बांधकामासाठी मंजुरी

 

राज्य मंत्रिमंडळाचा महत्वपूर्ण निर्णय

बुलढाणा, 14 ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी) : बुलढाणा-अजिंठा महामार्गावरील निसर्गरम्य परिसरात वसलेले गिरडा हे गाव आता विकासाच्या एका नवीन टप्प्यात प्रवेश करत आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यात्रास्थळ विकासासाठी कायमस्वरूपी बांधकाम करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. संत स्वयंप्रकाश महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण कायापालट करण्यासाठी श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगाव पुढे सरसावले असून, शासनाकडून या क्षेत्राच्या विकासासाठी संस्थानला कायमस्वरूपी बांधकाम करण्यास अधिकृत मंजुरी मिळाली आहे. गिरडा हे गाव बुलढाणा-अजिंठा महामार्गाजवळ अत्यंत निसर्गरम्य परिसरात वसले आहे. संत स्वयंप्रकाश महाराज यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली असून भाविकांमध्ये या क्षेत्राला विशेष धार्मिक महत्त्व आहे. परिसराचे धार्मिक महत्त्व लक्षात घेता, श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगाव यांच्या माध्यमातून या तीर्थक्षेत्राचा विकास केला जात आहे. यापूर्वी वृक्षलागवडीसाठी शेगाव संस्थानाला एकूण १९ हेक्टर ६ आर जमीनिचे वितरण करण्यात आले होते. यापैकी आता ३ हेक्टर ८१ आर जमिनीवर संस्थानला भाविकांच्या सोयीसाठी कायमस्वरूपी बांधकाम करण्याची परवानगी प्रशासनाने दिली आहे. या मंजुरीमुळे गिरडा येथे येणाऱ्या भाविकांसाठी मोठ्या प्रमाणावर सोयी-सुविधा निर्माण करणे शक्य होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश असणार आहे. संत स्वयंप्रकाश महाराज यांच्या वास्तव्याने व पदस्पर्शाने पावन झालेल्या या परिसराचे जतन आणि सुशोभीकरण करण्यात येणार आहे. शेगाव संस्थानच्या माध्यमातून गिरडा गावाचा विकास होणार असल्यामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि परिसरातील भाविकांमधून तीव्र समाधान व्यक्त होत आहे. या विकासकामामुळे हे ठिकाण एक प्रमुख धार्मिक आणि आध्यात्मिक केंद्र म्हणून नावारूपास येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत