spot_img

नगरजवळ भीषण अपघात; ढालसावंगी येथील ३२ वर्षीय ट्रकचालकाचा मृत्यू

मका घेऊन जात असताना लोखंडी सळ्यांनी भरलेल्या वाहनाला धडक; बुलढाणा तालुक्यावर शोककळा

बुलढाणा : नगरजवळ झालेल्या रस्ते अपघातात बुलढाणा तालुक्यातील ढालसावंगी येथील ३२ वर्षीय ट्रकचालकाचा मृत्यू झाला. मुश्तकीन पठाण असे मृत चालकाचे नाव आहे. शुक्रवारी आणि शनिवारच्या मध्यरात्री हा अपघात घडल्याची माहिती आहे. या घटनेमुळे ढालसावंगी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चांडोळ येथील मका व्यापारी शे. शिद्दीक शे. शफी यांच्या मालकीची मका भरलेली चौदा चाकी ट्रक (क्रमांक एमएच २८ बीबी ६२६३) घेऊन चालक मुश्तकीन पठाण हा नगर जिल्ह्यातील पिंपळगाव मांडवी येथे जात होता. प्रवासादरम्यान नगरजवळ ट्रकचा लोखंडी सळ्यांनी भरलेल्या वाहनाला अपघात झाला. या धडकेत चालक मुश्तकीन पठाण याचा मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. मुश्तकीन पठाण हा अवघ्या ३२ वर्षांचा होता. त्याच्या अकाली निधनामुळे ढालसावंगी गावावर शोककळा पसरली आहे. अपघात नेमका कसा घडला, याबाबत अधिक तपशील अद्याप समोर आलेला नाही.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत