बुलढाणा, 27 नोव्हेंबर (गुड इव्हिनिंग सिटी): उद्या बुलढाणा शहरात ना. प्रतापराव जाधव यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त बुलढाणा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शनिवार, दिनांक २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजल्यापासून आयोजित करण्यात आले आहे. हे रक्तदान शिबिर विजय जायभाये यांच्या निवासस्थान परिसरात, चिंचोले चौक, बुलढाणा येथे पार पडणार आहे. या सामाजिक उपक्रमाचे आयोजन एसपीएल आयुर्वेद मेडिकल कॉलेज, बुलढाणा यांच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार संजय गायकवाड, विशेष उपस्थिती मृत्युंजय गायकवाड नगरसेवक तथा गटनेते, नगरपरिषद बुलढाणा यांची उपस्थिती असणार आहे. रक्तदान हा सर्वश्रेष्ठ दान असून, या सामाजिक उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन विजय जायभाये माजी उपाध्यक्ष, न.प. बुलढाणा, निलेश राठोड उपसरपंच, सुंदरखेड आणि ॲड. पराग वाघ सरपंच, चिखला यांनी आले आहे





Total Users : 1453730