spot_img

खामगाव बस स्टँड परिसरात गांजा जप्त

 

स्थानिक गुन्हे शाखेचे कारवाई

बुलढाणा, 24 नोव्हेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : खामगाव येथील बस स्टॅन्ड परिसरात चिखलीच्या दोन आरोपींकडून गांजा जप्त करण्यात आला आहे. गांजा हा अंमली पदार्थ बाळगणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण ३ लाख १७ हजार ३५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पुढील तपासासाठी हा मुद्देमाल रिपोर्टसह खामगाव शहर पोलीस स्टेशन येथे सुपूर्द करण्यात आला आहे. २३ नोव्हेंबर रोजी खामगाव येथे ही कारवाई करण्यात आली. आरोपी सचिन प्रभाकर थिगळे व शेख सलीम शेख रजाक रा. चिखली हे खामगाव बस स्टॅन्ड परिसरात अवैधरित्या गांजा विक्रीच्या उद्देशाने बाळगून होते. त्यांच्याकडून ५ किलो ९४७ ग्रॅम वजनाचा गांजा किंमत २ लाख ९७ हजार ३५० रुपये व इतर साहित्य किंमत २० हजार रुपये असा एकूण ३ लाख १७ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या प्रकरणी खामगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून, कलम ८(क), २०(ब) NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि अपर पोलीस अधीक्षक पीयुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे यांच्या आदेशानुसार ही धडक कारवाई पार पडली. या कारवाई पथकात एपीआय सुनील इंगळे, हेकाँ दीपक लेकुरवाळे, हेकाँ राजू टेकाळे, हेकाँ अनुपकुमार मेहेर, हेकाँ विजय वारुळे, पोकाँ मंगेश सनगाळे, पोकाँ सतीश नाटेकर, पोकाँ आशा मोरे तसेच चालक म्हणून हेकाँ समाधान टेकाळे व पोकाँ निवृत्ती पुंड यांनी सहभाग घेतला. स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा येथील पोकाँ कैलास ठोंबरे यांनी यासाठी सहकार्य केले.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत