◾ टिपेश्वरचा “वॉकर-2” वाघ रणवीर दाखल
◾ धुरंधर आणि रणवीर मध्ये लढाईची शक्यता
बुलढाणा, 19 नोव्हेंबर (गुड इव्हिनिंग सिटी/रणजितसिंग राजपूत) : ज्ञानगंगा अभयारण्यात वाघांच्या अधिवासासाठी वन्यजीव विभागाने केलेले प्रयत्न फळाला येत असल्याचे दिसून येत आहे. धुरंदर आणि मोना या जोडीला आवडलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात आता रणवीर या तिसऱ्या वाघाची एन्ट्री झाली असून T3-C1 ज्याला वॉकर-2 असे वनशास्त्रीय नांव आहे, तो रणवीर वाघ मागील पाच वर्षांपासून टिपेश्वर मधून फरार आहे. एका दिवसापूर्वी तो ज्ञानगंगा अभयारण्यात पोहोचला आहे. अजिंठा मार्गे जंगल भागातून तो ज्ञानगंगा अभयारण्यात पोहोचला असावा असा अंदाज वन्यजीव अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
ज्ञानगंगा अभयारण्यमध्ये एकूण 7 वाघ अधिवास करू शकतील, एवढे वन्यक्षेत्र विकसित आहे. प्रारंभी येथे धुरंदर वाघाची एंट्री झाली त्यानंतर त्याला सहजीवनाचा आधार म्हणून मोना वाघिण ज्ञानगंगा अभयारण्यमध्ये दाखल झाली. या दोघांच्या भेटीचे फोटो सुद्धा वन्यजीव विभागाला प्राप्त झाले होते.
◾जंगल का राजा कौन?? युद्ध अटळ
आता रणवीर वाघ आल्याने धुरंधर वाघासोबत त्याचा संघर्ष होण्याची शक्यता अधिक आहे. “जंगल का राजा कौन”, यावर दोघांमध्ये युद्ध होऊ शकेल. यावरून नाही तर “मोना” वाघिणीवरून सुद्धा दोन वाघांमध्ये लढाई होऊ शकते, असा अंदाज आहे. अर्थात दोघांपैकी एकाने माघार घेतली तर हा रक्तरंजित संघर्ष टळू शकतो. वाघिणीला तीन ते चार प्रियकर असू शकतात, हे वन्यजीवशास्त्र सांगते





Total Users : 1450459