बुलढाणा, 9 नोव्हेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : मोताळा तालुक्यातील सावरगाव जहाँगीर गावाचा पाणी पुरवठा बंद झाला आहे. आपण या आधी तारांवर आकोडे टाकल्याच्या घटना बघितल्या असेल पण सावरगाव जहाँगीर येथील शेतकऱ्यांनी तर थेट डीपीमध्ये आकोडे टाकून पाण्याचा उपसा केला जात आहे. सावरगाव जहाँगीर गावाला उर्हा येथील धरणावरून पाणी पुरवठा केला जातो. पण या धरणावरील डीपीवर शेतकऱ्यांनी आकोडे टाकले आहे. त्यामुळे ओव्हरलोड होत असल्याने मोटारपंप सुरू होऊ शकत नाही. त्यामुळे सावरगाव जहाँगीर गावाला पाणीपुरवठा करणे कठीण झाले आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने पाणी पुरवठा करता येत नाही. यासंदर्भात महावितरणचे उपकार्यकारी अभियंता श्री डाबरे यांनी लक्ष घालणं गरजेचे आहे. गुड इवनिंग सिटीकडे डीपी मध्ये डायरेक्ट टाकल्याचे फोटो आहेत. महावितरणला आणखी कुठल्या पुराव्याची गरज आहे?? ऐन दिवाळीच्या सणात नागरिकांना पाणी मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. याची गंभीर दखल घेऊन महावितरणने कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.