spot_img

लोणार तालुक्यातील दोन बंजारा तांड्यांना मिळणार स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा!

अनुषंगिक कार्यवाहीस जिल्हास्तरीय समितीची मान्यता; लखीशाह आणि सेवागड तांड्यांचा विकासाचा मार्ग मोकळा

बुलढाणा : महाराष्ट्र शासनाच्या संत सेवालाल महाराज बंजारा/लमाण तांडा समृध्दी योजनेअंतर्गत बंजारा/लमाण तांडयांना स्वतंत्र महसुली गावांचा दर्जा देणेबाबत विषयाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय समितीची बैठक डॉ.प्रविणकुमार देवरे जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 18.11.2026 रोजी संपन्न झाली.

शासनाच्या “सेवा पंधरवाडा” अभियानाअंतर्गत संत सेवालाल महाराज बंजारा / लमाण तांडा समृध्दी योजनेच्या माध्यमातुन मौजे गंधारी ता.लोणार अंतर्गत “लखीशाह तांडा” व मौजे सावरगांव मुंढे अंतर्गत “सेवागड तांडा” या तांडयांना महसुली गाव घोषित करण्याबाबत उपविभागीय अधिकारी, मेहकर यांचेकडील प्रस्ताव जिल्हा स्तरीय समिती समोर महसुली गाव घोषित करणेच्या पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्यांत आला असता, सदर तांड्याना नव्याने महसुली गाव घोषित करण्यासाठी मान्यता देण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील मोठ्याप्रमाणात असलेल्या तांडा वस्त्यांना महसूली गावाचा दर्जा व स्वतंत्र ग्रामपंचायत निर्मिती करण्याची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी समितीचे अशासकीय सदस्य डॉ.प्रशांत गलसिंग राठोड, मेहकर व श्री.दिपक शिवसिंग साबळे, तरोडा ता.मोताळा यांनी सभेत चर्चा केली. यावेळी मा.जिल्हाधिकारी यांचे कक्षात समितीचे सहअध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.बुलडाणा डॉ.भालचंद्र चव्हाण , सदस्य सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवशंकर भारसाकळे, श्री.समाधान गायकवाड उपजिल्हाधिकारी (महसूल), दिलीप राठोड लोणार तालुकास्तर समिती सदस्य यांचे उपस्थितीसह दूरदृष्य प्रणालीद्वारे मेहकरचे उपविभागीय अधिकारी मेहकर,तहसीलदार लोणार व गटविकास अधिकारी लोणार यांची उपस्थिती होती.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत