spot_img

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आज मेहकरात

शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत, विविध योजनांचे लाभ व विकासकामांचे लोकार्पण-भूमिपूजन

.मेहकर : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब उद्या शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी मेहकर येथील शारंगधर नगरीत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी येणार आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी १ वाजता डी.पी. रोडवरील रीलायन्स मॉलसमोर भव्य शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला राज्याचे कामगार मंत्रीआकाशजी फुंडकर विधान परिषदेचे सदस्य आमदार किरण सरनाईक आमदार धीरज लिंगाडे आमदार सर्वश्री चैनसुख संचेती , संजय कुटे , संजय गायकवाड श्वेताताई महाले , मनोज कायंदे माजी आमदार संजय रायमुलकर माजी आमदार शशिकांत खेडेकर उपस्थित राहणार आहेत.

या मेळाव्यात शेतकरी कुटुंबातील विधवा, परित्यक्ता व आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना शिलाई मशीन वाटप, शेतकरी कुटुंबांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणे, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदतीचे धनादेश, लाडक्या बहिणींना भाऊबीज भेट म्हणून साडी व दिवाळी आनंदाचा शिधा किट वाटप करण्यात येणार आहे.

तसेच शेतकरी कुटुंबातील गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप, नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड, दिव्यांग बांधवांना सहाय्यक साहित्य, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी महिलांना मंजुरी आदेश व युवा सेनेतर्फे गुरूंना चारा वाटप उपक्रम राबविण्यात येणार आहे.

बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे धनादेश वाटप करण्यात येणार असून, बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचे ऑनलाइन लोकार्पण व भूमिपूजनही या कार्यक्रमात होणार आहे.

याच कार्यक्रमात मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या जळगाव जामोद येथील आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या शैक्षणिक सत्राचा शुभारंभ , युवा सेने तर्फे गुरांना चारा वाटप करण्यात येणार आहे

या भव्य कार्यक्रमासाठी समस्त शिवसेना, युवा सेना व महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तयारी केली असून, शेतकरी, नागरिक व लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत