spot_img

मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यामुळे बुलढाण्याच्या वाहतूक व्यवस्थेत बदल 

बुलढाणा, 15 सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) :- बुलढाणा शहरात दिनांक 19 सप्टेंबर गुरूवार रोजी एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचा बुलढाणा येथे दौरा  असुन दौर्‍याकरिता मुख्यमंत्री यांचे कर्‍हाळे ले-आऊट येथील हेलीपॅड वर आगमन होणार असून बुलढाणा शहरामध्ये विविध ठिकाणी स्मारकाचे तसेच इतर नवीन कार्यालयाचे उदघाटन कार्यक्रम प्रस्तावित असुन या कार्यक्रमाकरिता जिल्हयातील बहुसंख्य नागरिक सहभागी होणार आहेत. कायदा व सुव्यवस्था तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍या दरम्यान सामान्य नागरिकांना व वाहतुकीला अडचण येऊ नये म्हणून दिनांक 19 सप्टेंबर रोजी बुलढाणा शहरातील संपूर्ण वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्याबाबत पोलीस अधिक्षक, बुलढाणा यांनी कळवले आहे.

बुलढाणा शहराकडे येणारी वाहतुक सुरु असल्यास दौरा कार्यक्रमास अडथळा निर्माण होवून एखादा अपघात किवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच जनतेच्या सुरक्षिततेसाठी व बाहतुकीच्या सुनियमनासाठी सदर वाहतुक पर्यायी मार्गाने वळविणेबाबत पोलीस अधिक्षक, बुलढाणा यांनी निदर्शनास आणून दिले आहे. जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरीता बुलढाणा शहरातील संपुर्ण वाहतुक दिनांक 19 सप्टेंबर रोजी पुढीलप्रमाणे असेल

मोताळा कडून येणारी वाहतुक नांदुरा-खामगांव-चिखलीमार्ग-जालना अशी  पर्यायी मार्गे करण्यात आली आहे.

दिनांक 19 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपासुन ते 6 वाजेपर्यंत अशी वाहतुक व्यवस्था राहिल. सदर आदेशाचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 131 अन्वये उचित कार्यवाही करण्यात येईल.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत