बुलढाणा 23 जानेवारी (गुड इव्हिनिंग सिटी) ः खडक पूर्णा नदी पात्रातुन अवैध पद्धतीने वाळू उपसा करणार्या 30 लाख रुपयांच्या तीन बोटींना झिलेटिनच्या साहाय्याने उडवल्याची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई बुलढाणा व सिंदखेडराजा महसूल उपविभागाने पोलीस विभागाच्या सहकार्याने केली आहे. या कारवाईमुळे अवैध पद्धतीने वाळू उपसा करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.
सिंदखेड राजा येथील खडकपूर्णा नदीपात्रातून अवैध पद्धतीने वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होताच जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांचे मार्गदर्शना खाली करण्यात आली. खडकपूर्णा नदीपात्रात ड्रोन च्या साह्याने शोध मोहीम करण्यात आली. बोटी टाकून अवैधरित्या वाळूचा उपसा करणार्या 30 लाख रुपयांच्या तीन बोटीसह अन्य वस्तू शोधून जप्त करण्यात आली. शिवाय छत्तीसगड राज्यातील तीन मजुरांना ताब्यात घेण्यात आले, दरम्यान जप्त करण्यात आलेल्या तिन्ही बोटींना जिलेटिनच्या साहाय्याने उडवून नष्ट केल्या. महसूल विभागाच्या या धडक कारवाईमुळे अवैध पद्धतीने वाळू उपसा करणार्यांचे धाबे दणाणले आहे. हि कारवाई सिंदखेडराजा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे आणि बुलढाणा उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांच्या सुचनेने देऊळगावराजा तहसीलदार वैशाली डोंगरजाळ,चिखली तहसीलदार संतोष काकडे यांच्या पथकाने व पोलीस पथकाच्या साहाय्याने करण्यात आली.