बुलढाणा, 21 मार्च (गुड इव्हिनिंग सिटी) ः हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर काँग्रेस मधील अनेक जण हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे मागील काही दिवसाच्या पक्षप्रवेशावरून दिसून आले आहे. आ.संजय गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जोरात इनकमिंग चालू आहे. अॅड.गणेशसिंग राजपूत काँग्रेसमध्ये असताना त्यांच्या सोबत असलेले माजी जि.प सदस्य, पं.स.सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, विविध ग्रामसेवा सोसायटीचे सदस्य व शेकडो पदाधिकारी हे उद्या दिनांक 22 मार्च रोजी 2 वाजता श्री संत गजानन महाराज मंदीर थड येथे शिवसेनेत प्रवेश करणार आहे. या प्रवेश सोहळयाला पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, आ.संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे. अॅड.गणेशसिंग राजपूत राजपूत यांच्या माध्यमातून काँग्रेसला आधीच खिंडार पाडली असताना उद्याही त्यांच्या नेतृत्वात हजारो कार्यकर्ते पक्ष प्रवेश करणार आहे.