spot_img

मुंबईत आमदार संजय गायकवाड यांच्या छातीत चमक… पण चिंता नसावी!!

◾ सगळे रिपोर्ट नॉर्मल

बुलढाणा, 24 मार्च (गुड इव्हिनिंग सिटी/ रणजीतसिंग राजपूत) : विधानसभा अधिवेशनासाठी मुंबईत असलेल्या आमदार संजय गायकवाड यांच्या छातीत आज सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास अचानक कळ उठली होती. आज सकाळपासून त्यांना दोनदा छातीत दुखण्याचा त्रास झाला त्याच्यामुळे त्यांना तात्काळ जेजे हॉस्पिटल आणि नंतर हिंदुजा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. दोन्ही ठिकाणी आमदार गायकवाड स्वतः चालत गेले होते हे विशेष. हॉस्पिटल मधील डॉक्टरांच्या टीमने तात्काळ त्यांच्या सर्व तपासण्या केल्या. त्यांचे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आल्याचे समजते. विशेष म्हणजे त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यासंदर्भात गुड इव्हिनिंग सिटीने त्यांच्याशी संपर्क साधला असता आ. गायकवाड यांनी सांगितले की, आज सभागृहात मतदार संघातील प्रश्न मांडण्यासोबतच बेताल वक्तव्य करणाऱ्या कुणाल कामराला भाषणातून झोडून काढले… प्रश्न मांडण्याआधी मी सखोल अभ्यास करतो.. मुद्दे मांडताना आणि खोडतांना तथ्यांसह बोलतो… पण यासाठी मला प्रचंड मेहनत घ्यावी लागते… केवळ दोन तासच झोप होत आहे… शेकडो किलोमीटरचा सततचा प्रवास आहे… त्यामुळे स्ट्रेस वाढला आहे… त्याचाच त्रास झाला असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे… अर्थात मला काही फरक पडत नाही, माझ्या कामाची गती जी आहे तीच राहिल”, या शब्दांत आमदार गायकवाड यांनी आपल्यातील दुर्दम्य आत्मविश्वास व्यक्त केला. आ. गायकवाड यांच्यासोबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, निषाद येरमुले सोबत आहेत. आमदार गायकवाड आपल्या आक्रमक शैलीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय नेते असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते निकटवर्तीय आहे. राज्यात पहिलीपासून सीबीएसई पॅटर्नची घोषणा नुकतीच झाली आहे. यासाठी आमदार संजय गायकवाड यांचा पाठपुरावा महत्वाचा मानला जातो.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत