-गिरोली येथील आरोपी ताब्यात
देऊळगांवराजा, 30 मार्च (गुड इव्हिनिंग सिटी/पूजा कायंदे) : स्वीफ्ट डिझायरमध्ये आढळलेला पोलिसाचा मृतदेह बरेच काही सांगून गेला आणि पोलिसांनी या हत्येचा उलगडा केला आहे. पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर पांडुरंग म्हस्के यांचा सुपारी देवून गळा आवळून खून करण्यात आल्याचा शोध लागला आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपी ताब्यात घेतला आहे, हे विशेष. या प्रकरणात एकापेक्षा अधिक आरोपी असल्याची माहिती गुड इव्हिनिंग सिटीला मिळाली असून या खूनाला अनैतिक संबंधांची किनार आहे की, आर्थिक देवाणघेवाण अथवा इतर काही कारण, याचा कसून तपास सुरु आहे.
जालना पोलिस दलातील ज्ञानेश्वर पांडुरंग म्हस्के (वय 38, गिरोली खुर्द, ता. देऊळगाव राजा) यांचा मृतदेह त््याांच्या स्वतःच्या स्विफ्ट डिझायर कारमध्ये आढळून आला. सदर घटना आज, 30 मार्च रोजी देऊळगाव राजा- सिंदखेडराजा रोडवरील आरजे इंटरनशनल स्कूलसमोरच्या वन विभागाच्या जागेत उघडकीस आली होती.म्हस्के यांचा मृतदेह गाडीतुन आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. प्राथमिक तपासात गळा आवळून हत््याा झाल्याचा संशय व्यक्त केला गेला. विशेष म्हणजे गाडी आतुन लॉक होती, त््याामुळे हा घातपात की आत्महत्या याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. पण गळ्यावरील व्रण सांगत होते की, ही हत्याच आहेस्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि दूसऱ्याच क्षणाला तपासाला सुरुवात झाली. पोलिसांनी दिवसभरात तांत्रिक आणि मानवी अशा दोन्ही पातळ्यांवर योग्य दिशेने तपास करून आरोपीचा छडा लावलाच. पोलिस कर्मचारी म्हस्के यांच्या खूनामागे गिरोली येथीलच काही आरोपी आहे. यात तेथीलच एका मोठ्या नेत्याचे नांवही पुढे येत आहे. अर्थात इतर आरोपी पळून जावू नये, म्हणून आरोपींची नांवे पोलिसांनी उघड केली नाहीत. गुड इव्हिनिंग सिटीसुद्धा सहकार्य म्हणून सदर नांवे छापण्याचे टाळत आहे. पुढील काही तासांत पोलिसांनी आरोपींची नांवे उजागर केली की, वाचकांना ती कळतील. पण पोलिस कर्मचाऱ्याचा खून झाला, आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे आणि या प्रकरणामागची कारणमिमांसा गुड इव्हिनिंग सिटीने वाचकांपर्यंत पोहोचविली आहे. उपविभागीय अधिकारी मनिषा कदम, एलसीबी पथक आणि पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांना सदर प्रकरणात जवळपास यश मिळाले आहे.