बुलढाणा, 2 एप्रिल (गुड इव्हिनिंग सिटी) : प्रेमाची अन् बंधुभावाची शिकवण देणारा सण म्हणजे रमजान ईद सद्यास्थितीत असलेल्या सामाजिक परिस्थितीमध्ये सर्वधर्मीय बांधवांनी आपली एकात्मता जपत सामाजिक समता, बंधुता अबाधित राखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. पत्रकार हे नेहमीच समाजाच्या हितासाठी रात्रंदिवस आपले काम करीत असतात. समाजा समाजात बंधूभाव नांदला पाहिजे यासाठी आपल्या लेखणीतून नेहमीच व्यक्त होतात. देशातील बदलत्या सामाजिक परिस्थितीला निव्वळ या देशातील काही मूठभर समाज विघातक प्रवृत्ती कारणीभूत असून या सर्व गोष्टींना विरोध करणे हे प्रत्येक भारतीय नगरिकाचे कर्तव्य नाही तर जबाबदारी आहे. त्यामुळे सर्वांमध्ये प्रेमाची व सलोक्याची भावना निर्माण व्हावी या उदात्त हेतूने बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने ईद मिलन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यत आले आहे. शुक्रवार, 4 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता पत्रकार भवन, सैनिकी मंगलकार्यालयाजवळ बुलढाणा येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.