बुलढाणा, 5 एप्रिल (गुड इव्हिनिंग सिटी) ः मर्यादा पुरूषोत्तम प्रभु श्रीराम नवमी निमित्य दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या रविवार, दिनांक 6 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता या शोभायात्रेला सुरूवात होणार आहे. श्रीराम नवमी निमित्त श्री गजानन महाराज चौक विष्णूवाडी बुलढाणा येथून या शोभयात्रेस सुरूवात होऊन कारंजा चौकात पोहचणार आहे.
यामध्ये शोभायात्रेचे प्रमुख आर्कषण दिंडी, महिला झांझ पथक, महाकाल झांझ पथक, हिंदवी स्वराज्य ढोल पथक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, बजरंग बली, प्रभू श्रीराम मुर्ती असणार आहेत.
तरी सर्वांनी मोठया संख्येने या शोभायात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन श्रीराम नवमी शोभायात्र समिती बुलढाणा यांच्याकडून करण्यात आले आहे.