spot_img

चिंताजनक ! बुलढाण्याचे पाच जण अडकलेत पहलगाम मध्ये… पत्रकार अरूण जैन यांच्या कुटूंबियांचा समावेश

बुलढाणा, 23 एप्रिल (गुड इव्हिनग सिटी) ः पहलगाममध्ये काल दुपारी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात जवळपास 27 जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने जगात खळबळ उडाली आहे. यात महाराष्ट्राच्याही काहींचा समावेश आहे. हल्ल्याची घटना समोर आल्यानंतर जम्मू-काश्मिरमध्ये आपलं कुणी अडकलंय का ? याची चौकशी सगळ्याच ठिकाणाहून सुरु आहे. गुड इव्हिनिंग सिटीला मिळालेल्या माहितीनुसार सकाळचे पत्रकार अरूण जैन यांची दोन्ही मुलं, भाऊ आणि त्यांचे कुटूंबिय सध्या पहलगामध्येच अडकलेले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे केवळ 10 मिनीटांच्या हुकाचुकीमुळे जैन कुटूंबिय अतिरेकी हल्ल्यातून बचावले. ‌‘आम्हांला येथून सुरक्षित स्थळी हलवा‌’, अशी आर्जव जैन कुटूंबियांनी सरकारकडे केली आहे.
पत्रकार अरूण जैन यांचे बंधू निलेश जैन मुंबई येथे जीएसटी ऑफिसर आहेत. 18 एप्रिल रोजी निलेश जैन पत्नी सौ. श्वेता आणि मुलगी अनुष्का सह जम्मू काश्मिर पर्यटनासाठी निघालेत. त्यांच्यासोबत अरूण जैन यांची दोन्ही मुले ॠषभ आणि पारस सहभागी झालेत. असे पाचही जण इतर ठिकाणचे पर्यटन दर्शन करून 21 एप्रिल रोजी पहलगाममध्ये दाखल झाले होते. सर्व जणांचा पहलगाममधील स्थानिक हॉटेलमध्ये मुक्काम होता. दूसऱ्या दिवशी सकाळी ते पहलगाम फिरायला बाहेर पडणार होते. परंतु त्याआधीच मिनी स्वित्झर्लंडया साईट सिनच्या ठिकाणी अतिरेक्यांनी गोळीबार करून पर्यटकांना ठार केले. गोळीबार झाल्याची बातमी हॉटेलमध्ये धडकली आणि जैन कुटूंबिय थांबले. म्हणजे काही मिनीटांनी उशीर झाल्यामुळे थांबलेला जैन परिवार अतिरेकी हल्ल्यातून बचावला. गुड इव्हिनिंग सिटीकडे एक व्हिडीओ जैन कुटूंबियांनी पाठविला असून त्यात निलेश जैन यांनी सरकारकडे सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. पत्रकार अरूण जैन यांनी गुड इव्हिनिंग सिटीला सांगितले की, त्यांचा संपूर्ण परिवार सुरक्षित असून लवकरच ते श्रीनगरकडे रवाना होत आहे. आमच्यासाठी प्रार्थना करणाऱ्यांचे मनःपूर्वक धन्यवाद‌’, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे.

 

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत