चिखली तालुक्यातील एका विद्यार्थ्याचा समावेश
बुलढाणा, 10 मे (गुड इव्हिनिंग सिटी) : गडचिरोली शासकीय मेडिकल कॉलेजच्या एम.बी.बी.एस.च्या ३ विद्यार्थ्यांचा सावली तालुक्यातील वैनगंगा नदीपात्रात बुडून मृत्यू. आज १० मे रोजी सायंकाळी ४ वाजता ही घटना घडली. चिखली जि.बुलढाणा येथील गोपाल गणेश साखरे (वय२०) या विद्यार्थ्यांचा मृतामध्ये समावेश आहे. चंद्रपूर -गडचिरोली सीमेवरील नदीच्या पुलाखाली वैनगंगा नदीच्या पात्रात आंघोळीसाठी गेलेल्या गडचिरोली येथील रुग्णालयातील आठ पैकी तीन शिकावू डॉक्टर हे बुडाल्याची माहिती प्राप्त झाली असून घटनेची माहिती मिळताच सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप पुलरवार हे आपल्या चमूसह घटनास्थळी तपासणी करत आहे.
सदर तीनही युवक हे गडचिरोली येथे MBBS चे प्रथम वर्गात शिक्षण घेत आहे. आज सुट्टी असल्याने हे सर्व जण नदीमध्ये अंघोळीसाठी गेले होते. यावेळी ऐकून 8 जण होते मात्र त्यापैकी गोपाळ गणेश साखरे, पार्थ बाळासाहेब जाधव, स्वप्नील उद्धवसिंग शिरे हे बुडाले असून या युवकांना काढण्यासाठीचे शर्तीचे प्रयत्न सुरू आपदा ग्रुप व पोलीस विभाग करीत आहे.
यापूर्वी ही याच जागेवर चंद्रपूर येथील 3 बहिणींचा बुडून मृत्यू झालेला होता हे विशेष !