आ.गायकवाड यांचा बैल मारकुंडा असल्याची अफवा
बुलढाणा, 16 जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) ः लातुर जिल्ह्यातील हाडोळती येथील वृध्द शेतकरी दाम्पत्य बैल नसल्याचे कारणाने औत ओढत असतांनाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. त्यानंतर अनेकांनी संवेदना व्यक्त केल्या पण त्या पलीकडे जावून आमदार संजय गायकवाड यांनी त्या कुटुंबाला मदत केली. आ.गायकवाड यांनी त्या कुटुंबाला दिलेली बैलजोडीतला एक बैल मारकुंडा असल्याच्या बातम्या आल्या त्यामुळे आ.गायकवाड यांनी याबाबत वृृध्द शेतकरी दाम्पत्याकडे एक प्रतिनिधी पाठवला त्या प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधलेला व्हिडीओ आ.गायकवाड यांनी गुड इव्हिनिंग सिटीला पाठविलेला. त्यामध्ये शेतकरी अंबादास पवार यांनी याबाबत खुलासा करतांना सांगितले की, गावातील काही लोकांनी विनाकरण बैल मारकुंडा असल्याची अफवा पसरली. आ.गायकवाड यांनी दिलेल्या बैलांना लहान मुले, महिला त्यांचा चारापाणी करतात. मी स्वतः त्या बैलावर कोळपणी केली. त्यातील बैल हा मारकुंडा नाही. आ.गायकवाड यांनी केलेेली मदत आयुष्यभर विसरणार नाही असे सांगितले.
बैलजोडीतला एक बैल मारकुंडा असल्याचे कॅमेरापुढे सांगा, असा दबाव त्यावेळी काहींनी आपल्यावर टाकला असे मुक्ताबाई पवार यांनी सांगितले.