spot_img

बुलढाण्यात हिट अँड रन केस : भरधाव कारने दुचाकीस्वारास उडविले

बुलढाणा, 27 नोव्हेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : सर्कुलर रोडवर स्थित बुलढाणा अर्बन शाखेच्या जवळ मोठा अपघात घडला. एका भरधाव स्विफ्ट डिझायर कारने दुचाकीस्वाराला मागून उडविले. यानंतर सदर कारचालकाने घटनास्थळावरून पोबारा केला. थोडया वेळापूर्वी रात्री दहा वाजता दरम्यान झालेल्या या अपघातात प्रशांत किसनराव जाधव गंभीर जखमी झाले असून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. डोक्यातून खूप मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने प्रशांत जाधव गंभीर आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. महावीर नगर निवासी 42 वर्षीय प्रशांत जाधव कामगार असून इलेक्ट्रिक बिल वाटपाचे काम करतात. ज्या कारने जाधव यांना उडवले त्याच कारने इतरही एक ते दोन जणांना अशाच प्रकारे कट मारून जखमी केले. पण ते किरकोळ आहेत. सदर कारचा शोध घेण्यात येत असून पोलीस सीसीटीव्ही फुटेज जमा करत आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत