डोंगरशेवलीच्या ॠतुजा सावळेचा अपघातात मृत्यू
बुलढाणा, १६ डिसेंबर (गुड इव्हिनिग सिटी) ः दुचाकीच्या अपघातात एका विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आईवडीलांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकर करण्यासाठी ॠतूजा सावळे हीने प्रचंड मेहनत घेतली. तिच्या वडीलांनी सुध्दा तिला डॉक्टर बनविण्यासाठी खुप प्रयत्न केले. डॉक्टर व्हावी यासाठी ॠतुजाला परदेशात सुध्दा पाठविण्याची तयारी गणेश सावळे यांची होती. परंतू तिचा राजर्षी शाहू महाराज आयुर्वेद महाविद्यालय येथे वैद्यकीय शिक्षणासाठी नंबर लागला. त्यामुळे आनंदाचे वातावरण होते. आज ॠतुजा कॉलेजसाठी निघाली पण गावापासून काही अंतरावर जात नाही तर तिच्यावर आज काळाने घाला घातला अन् तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न अर्ध्यावर राहिले.
ॠतुजा गणेश सावळे वय १९ रा.डोंगरशेवली ही राजर्षी शाहू महाराज आयुर्वेद महाविद्यालय बुलढाणा येथे प्रथम वर्षाला शिक्षण घेत होती. आज १६ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता ॠतूजा कॉलेजकडे येण्यासाठी निघाली होती. याच दरम्यान ती बजाज चेतक गाडीवर होती. त्यावेळी बसच्या बाजूला ती गाडी चालवत होती. समोर जात असतांना समोरून येणार्या दुचाकीने ॠतूजाला धडक दिली. या धडकेमुळे ती एका बाजूला जाण्याच्या प्रयत्नात तिचे डोके बसला धडकले. यामध्ये ती खाली कोसळली आणी यात गंभीर जखमी झाली. त्यानंतर तिला उपचारासाठी जिल्हा सामान्य रूग्णालय बुलढाणा येथे दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर ॠतूजाला मृत घोषीत केले. यामुळे संपूर्ण महाविद्यालय व डोंगरशेवली गावावर शोककळा पसरली आहे. तीच निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ॠतुजा एमबीबीएस साठी सुध्दा पात्र झाली होती अशी माहिती कळते.



