बुलढाणा, १९ एप्रिल (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत) ः आरोपी सोनू उर्फ ऋतिक वसंत जाधव हा १४ एप्रिलच्या रात्री खूनासाठी हपाललेला होता का? असा प्रश्न तुम्हालांही पडेल, जेव्हा पुढील वृत्त तुमच्यासमोर येईल. वार्ड क्र. २ मधील पप्पू उर्फ सागर भाऊराव जाधवला संपविण्याआधी आरोपी सोनू याने भिमनगरमधील एका युवकावर त्याच स्थळी चाकूहल्ला केला होता. पप्पूचा मर्डर करण्याच्या तीन तास आधी म्हणजे रात्री ८ वाजेदरम्यान सोनू याने मंगेश दशरथ शिराळे याच्याशी किरकोळ वाद घालून त्याच्या गुप्तांगात चाकू खुपसला होता. मंगेशच्या मित्राने सोनूच्या तावडीतून मंगेशला सोडविले नसते तर मंगेशचाही मर्डर झालेला असता. सदर प्रकरणी गंभीर अवस्थेत मंगेशला रूग्णालयात भरती करण्यात आले होते. दूसर्या दिवशी त्याच्या जबाबावरून आरोपी सोनूविरोधात घातक शस्त्राने गंभीर दुखापत करण्याची कलम ११८ (२) तसेच कलम ३५२ दाखल करण्यात आली आहे.
गुड इव्हिनिंग सिटीला पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगेश दशरथ शिराळे वय ३४ वर्ष राहणार भीम नगर वार्ड क्रमांक दोन बुलढाणा दिनांक १४ एप्रिल रोजी रात्री आठ वाजता दरम्यान बुलढाणा मार्केट मधून घराकडे जाण्याकरिता आठवडी मार्केट जवळील जयस्वाल दारू दुकानासमोरून घरी चाललो होतो त्यावेळी माझ्यासोबत मित्र संदीप डुकरे सुद्धा होता तेवढे रस्त्याने जात असताना सोनू उर्फ ऋतिक वसंता जाधव व अंदाजे २५ वर्ष राहणार कैकाडी पुरा बुलढाणा हा समोरून चालत आला त्यावेळी त्याला धक्का लागला त्यावेळी सोनू हा मंगेशसोबत वाद करू लागला. मंगेशने त्याला माफी मागितली तरी सोनू जाधवने वाद केला व त्याला शिवीगाळ करू लागला व त्याच्या हातामध्ये काहीतरी धारदार वस्तूने मंगेशच्या गुप्तांगावर मारले त्यामुळे जखम झाली त्यावेळी सोबत असलेला मित्र संदीप डुकरे याने मंगेशला सोनूच्या तावडीतून सोडवले. नंतर दोघेही घरी गेले परंतु थोड्या वेळात मंगेशच्या गुप्त अंगावर झालेल्या जखमेतून रक्त निघू लागले म्हणून तो तातडीने उपचार घेण्यासाठी शासकीय रुग्णालय बुलढाणा येथे पोहोचला. जखम पाहून डॉक्टरांनी त्याला भरती केले. सदर जखम धारदार चाकूने केल्याचे डॉक्टरांच्याही लक्षात आले होते. मंगेशच्या गुप्तांगावरील अंडकोषावर खोल जखम झालेली आहे. आपल्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याची तक्रार मंगेश शिराळे याने दूसर्या दिवशी पोलिसांत दिली.
रात्री ८ वाजता मंगेशवर जीवघेणा हल्ला आणि त्याच्या तीन तासानंतर पप्पू जाधवचा मर्डर करणार्या सोनूला २४ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी पोलिसांच्या पथकाने सळो की पळो करून सोडल्यामुळे आरोपी सोनूने पोलिसांसमोर नांग्या टाकल्या होत्या. ठाणेदार रवि राठोड यांच्या मार्गदर्शनात पोलिसा प्रकरणाचा खोलवर तपास करीत आहेत.



