‘हृदया-हृदयांत मशाल पेटवा.. गद्दारांचा कारभार जाळा’

बुलढाणा, ८ नोव्हेंबर (गुड इव्हिनिंग सिटी/अजय काकडे): ‘गेल्या वेळेला आपण चूक केली.. प्रत्येक ठिकाणी आपल्याविरूद्ध आपला गद्दार उभा राहिला आहे.. चूक सुधारण्यासाठी जयश्रीताईला उमेदवार म्हणून दिलेले आहे.. जयश्रीताई कशा आहेत, तुम्हाला माहित आहे.. आज जयश्रीताईंचं भाषण मी पहिल्याप्रथम ऐकलं.. आणि मला असं वाटलं की आता यांच्या भाषणानंतर मला बोलायचीच गरज नाही.. सगळं व्यवस्थित त्यांनी सुपडासाफ करून टाकला.. छत्रपर्तिचा पवित्र भगवा मावळ्याच्या हातात शोभतो, दरोडेखोराच्या हातात नाही.. म्हणून हृदया हृदयात मशाल पेटवा.. गद्दारांचा कारभार जाळा’, असे कडक आवाहन शिव- सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज बुलढाण्यातील विराट सभेतून केले. महाविकास आघाडीकडून उबाठाच्या उमेदवार अॅड. जयश्रीताई सुनिल शेळके यांच्या प्रचारार्थ एआरडी सिनेमॉलच्या मागील प्रांगणात उद्धव ठाकरेंची आज सभा झाली. या सभेत मंचावर खा. अरविंद सावंत, आ. मिलिंद नार्वेकर, आ. धिरज लिंगाडे, माजी आमदार रेखालाई खेडेकर, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, माजी आमदार राहूल बोंद्रे, माजी आमदार धूपतराव सावळे, प्रा. नरेंद्र खेडेकर, जालिंदर बुधवत, नरेश शेळके, दिलीपराव जाधव, प्रा.डी. एस लहाने विजय अंभोरे, बी.टी. जाधव, लखन गाडेकर, दत्ता काकस तसेच महाविकास आघाडीचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या भाषणातून ठाकरेंनी महायुती आणि मोदींवर तिखट प्रहार केले. तत्पूर्वी सुरुवातीला ते म्हणाले की, ‘लोकसभेत निसटता पराभव झाला… थोडी मतं आणखी इकडून तिकडून खेचली असती तर लोकसमेत इथून गेलेला तो सुद्धा गद्दार आपण तेव्हाच पाडला असता.. ठीक आहे. प्रत्येकाची एक वेळ यावी लागते.. त्याची वेळ सुटली.. शेपटावरती निभावलं.. पण याची वेळ काही सुटत नाही.. या गद्दाराला गाडायचा म्हणजे तो नकली दातासकट पळून गेला पाहीजे.’ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर बांधण्यात 1 येईल. पण शिवराय हा शब्द उधारल्यानंतर लगेच देवेंद्र फडणवीस यांच्या अंगाची आग होते. त्यांना ते सहनच होत नाही, असे ते म्हणालेत. भाजपला केवळ मतांसाठी शिवाजी महाराज हवे असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. उद्धव ठाकरे यांची शुक्रवारी दुपारी बुलढाण्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा झाली. यावेळी बोल- ताना त्यांनी महायुती विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, आपण सर्व महाराष्ट्र प्रेमी आहोत. पण दुसरीकडे महाराष्ट्र लुटणारे महाराष्ट्र द्रोही आहेत. मागच्यावेळी आपल्याकडून एक चूक झाली. मी सध्या निवडणुकीच्या प्रच- ारासाठी फिरत आहे. पण प्रत्येक ठिकाणी आपल्याविरोधात आपलाच गद्दार उभा राहिला आहे. साहजिकच चूक माझीच होती.उद्धव ठाकरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळे निर्माण केले. हा शिवरायांचा पवित्र भगवा मावळ्याच्या हातात शोभतो, दरोडेखोरांच्या हातात शोभत नाही. आपल्या पक्षावर त्यांनी दरोडा घातला. चोरी नव्हे अख्खा दरोडा घातला. ४० जणांच्या टोळीने दरोडा टाकून आपला पक्ष चोरून नेला. आता म्हणतात हा पक्ष आमचाच आहे. हे गद्दार, धोकेबाज व खोकेबाज लोक आहेत. पण आता ५० खोके नॉट ओके. त्यांनी आपल्या भावी पिढ्यांसाठी भरपूर कमावले आहे. त्यांची घरे भरली. पण गरिबांची रिती झाली. त्यामुळे आता प्रश्न सर्वसामान्य जनतेचा आहे. त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची गरज आहे. बुलढाणा म्हटले की मातृशक्तीला वंदन केलेच पाहिजे. आपले सरकार आल्यानंतर राज्यातील माले जिल्हा शिवाजी महाराजांचे एक चांगले प्रत्येक हे गद्दार जिकडे पळून गेले होते, त्या सुरतेतही बांधणार आहे. का नाही बांधायचे? हे केवळ घंटा वाजवण्यासाठी व केवळ पळी पंचपात्र घेऊन बसण्यासाठी नसेल. हे मंदिर आमचे संस्कारपीठ असेल. देवेंद्र फडणवीस शिवाजी महाराजांच्या मंदिरावर आक्षेप घेत आहेत. कारण, शिवाजी महाराज की जय म्हटले की, त्यांच्या अंगाची आग होते. त्यांनी मला मुंब्यात मंदिर बांधण्याचे आव्हान दिले. मुंब्रा महाराष्ट्रातच आहे. फडणवीस यांनी आमचा दाढीवाला गद्दार फोडून जो आपल्या डोक्यावर बसवला आहे, तो मिंधे ज्या जिल्ह्यातील आहे, त्याच जिल्ह्यात हे मुंब्रा आहे. फडणवीस यांनी हे लक्षात घ्यावे. मग तुम्ही अडीच वर्षे त्यांच्यासोबत अंडी उबवत बसला होतात का? ज्या जिल्ह्यातील तुम्ही मुख्यमंत्री केला, त्या जिल्ह्यात मंदिर बांधणे तुम्हाला अवघड वाटते का? आजही मुंब्याच्या वेशीवर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर, सावित्रीबाई, जिजाऊ यांची चांगली शिल्पे उभी करण्यात आली आहेत. मग मंदिर महाराजांचे नाही तर काय मोदींचे बांधायचे? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. हर्षवर्धन सपकाळ यांनीही आपल्या भाषणातून आ. संजय गायकवाड यांच्यावर सडकून टिका केली. राहुल बोंद्रे यांनीही महायुतीवर आपल्या मनोगतातून प्रहार केले. सभेचे उर्जादायी संचलन पत्रकार गजानन धांडे यांनी केले. राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली.

नकली दात घालणारे हे नकलीच आहे : अॅड. जयश्रीताई शेळके

“बुलढाण्याच्या विद्यामान आमदारांनी गळ्यात नकली वाघाचा दात घताला. सांगत होते की, दात असली आहे. वाघाची शिकार करून दात काढल्याचे सांगितले परंतू ज्यावेळी टेस्टिंग झाली तेव्हा तो दात प्लास्टिकचा निघाला. आधीच्या लोकप्रतिधिंनी केलेले कामे आपण केल्याचा आव आणला जात आहे. शेत रस्त्याची कामे रखडलेली आहे. मोताळा एमआयडीसी झालेली नाही. ढोंगीपणाचा कळस म्हणजे बुलढाण्याचे महायुतीचे उमेदवार आहे अशी तिखट टीका महाविकास आघाडीच्या उमेदवार अॅड. जयश्रीताई शेळके यांनी केली.