अटीतटीच्या लढतीत ॲड. जयश्रीताई यांचा ८४१ मतांनी पराभव
बुलढाणा, २३ नोव्हेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : बुलढाणा विधानसभेत संजय गायकवाड यांनी सलग दुसऱ्यांदा आमदार होण्याचा मान मिळविला आहे. १९९९ पासून ते बुलढाणा विधानसभा लढत आहे. यामध्ये फक्त त्यांनी २००९ मध्ये विधानसभा लढवली नव्हती. २०१४ ला ते मनसेकडून निवडणूक लढले होते. त्यांनी त्यावेळी दुसऱ्या क्रमांकाचे मते मिळवली होती. २०१९ ला त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली आणि ते पहिल्यांदा निवडून आले. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. उध्दव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. २०१९ च्या डिसेंबर महिन्यात कोरोना महामारी आली. त्यात सारे विश्व टप्प पडले होते. विकास कामांचा निधी रोखला होता. कोरोना संपत नाही. तर शिवसेनेत फुट पडल्या नंतर एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले. आ.संजय गायकवाड यांनी एकनाथराव शिंदे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. बुलढाणा शहरात विविध विकासाची कामे खेचून आणले.बुलढाणा शहराच्या सौंदर्यात भर पडली ती विविध महापुरूषाच्या स्मारकांची. तसेच त्यांनी बुलढाणा शहरात विविध विकासाची कामे केले.
२०२४ च्या विधानसभेत कुठलाही मोठा नेता प्रचार सभेला आला नाही. तरी त्यांनी एकट्याच्या बळावर निवडणूक लढवली. गेल्या विधानसभा ते अत्यंत आक्रमकपणे लढले पण या विधानसभेत आ. गायकवाड यांनी कुठले ही विधान न करता अत्यंत संयमाने ही निवडणूक लढले अन् जिंकले सुध्दा. आज सकाळ पासूनच पाहिल्या फेरीनंतर आ. गायकवाड यांनी घाटाखालून लीड घेतला. बुलढाणा शहरात आल्या नंतर तो लीड कमी झाला. पण नंतर पुन्हा वाढला. देऊळघाट मध्ये जयश्रीताई शेळके यांना लीड मिळाला होता. परंतू पुन्हा आ. गायकवाड यांनी आघाडी घेत ती कायम ठेवली. त्यांचा ८४१ मतांनी विजय मिळवला. त्यांच्या विजयनंतर बुलढाणा शहरात त्यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचे जनसंपर्क कार्यालय ‘मातोश्री’ या ठिकाणी मोठा जल्लोष साजरा केला. जिल्ह्यातून २००४ नंतर पहिल्यांदा ते ऐकमेव शिवसेनेचे आमदर राहिले आहे. या आधी दोन आमदार जिल्ह्यातून निवडून जायचे.