हर्षवर्धन सपकाळ यांच्या पत्रावर राज्यपाल कार्यालयाचे निर्देश

बुलढाणा, 22 नोव्हेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) – बुलढाणा विधानसभेतील विकासकामांमध्ये अनियमितता तसेच भ्रष्टाचार असल्याबाबत काँग्रेसचे राष्ट्रीय नेते तथा बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी वेळोवेळी याबाबत भुमिका मांडली आहे. विधानसभा निवडणूकीच्या प्रचारसभांमध्ये जाहीरपणे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे विविध आरोप केले आहे. त्याच अनुषंगाने बुलढाणा येथे राज्यपाल श्रीराधाकृष्णान हे आले असता त्यांना बुलढाणा विधानसभा मतदार संघातील विविध विकासकामांमध्ये अनियमितता झाल्याबाबत तक्रार केली होती. त्यावर कार्यवाही करीत राज्यपाल सचिवालयातून एक पत्र 12 नोव्हेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आले आहे. त्या पत्रात म्हटले आहे की, बुलढाणा विधानसभा मतदार संघात विकास कामांवर खर्च करण्यात आलेल्या निधीबाबत श्वेतपत्रिका प्रकाशीत करून आर्थिक अनियमिमतता व भ्रष्टाचाराची चौकशी करण्याबाबत कार्य करण्याचे आदेश देण्यात आले आहे. या पत्रावर विनायक गवाणकर राज्यपालांचे अवर सचिव (प्रभारी) यांची स्वाक्षरी आहे.
याबाबत काँग्रेसचे राष्ट्रीय नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी हे पत्र त्यांच्या सोशल मिडीया आकऊंट वर टाकले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की,बुलढाणा विधानसभा मतदारसंघात गत पाच वर्षापासून झालेल्या विकास कामात मोठी अनिमित्त व भ्रष्टाचार झालेला असून त्याचा पडदा फाश केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही.
केवळ विकासाच्या गप्पा मारून, हवेत गोळीबार झालेला आहे. जोपर्यंत श्वेतपत्रिका प्रकाशित होत नाही,तोपर्यंत मंजूर विकास कामे- मंजूर निधी -खर्च झालेला निधी व ठेकेदारांचे नाव समजायला मार्ग नाही करिता महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल यांना प्रत्यक्ष भेटून शेतपत्रिका प्रकाशित करण्याची मागणी केली होती, तेव्हा राज्यपाल महोदयांनी राज्य शासनाला श्वेतपत्रिका प्रकाशित करण्याचे निर्देश दिलेले आहेत.





Total Users : 1356460