बुलढाणा, २६ डिसेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : बागेश्वर धाम सरकार हे बुलढाणा जिल्ह्यात येणार असल्याचा अंदाज आहे. मध्य प्रदेश राज्यातील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात स्वयंभू हनुमान मंदिर असून हे बागेश्वर धाम म्हणून ओळखले जाते. बागेश्वर धाम बाबा धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमांना देशभरात प्रचंड प्रतिसाद भाविक भक्तांचा मिळत असतो.
सध्या धीरेंद्र शास्त्री यांची कथा जळगाव खान्देश जिल्ह्यातील धरणागाव तालुक्यातील पारधी जवळील झुरखेडा पथराड मार्गावर दिनांक २५ ते ३० डिसेंबर दरम्यान बागेश्वर धाम स्थित धीरेंद्र शास्त्रींच्या श्री हनुमंत कथा व दिव्य दरबाराचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले आहे. जळगाव खान्देश येथील कार्यक्रम संपल्यानंतर किंवा मध्ये धीरेंद्र शास्त्री हे शेगावला जाण्याची शक्यता आहे. गजानन महाराज संस्थानच्या सामाजिक कार्याने प्रभावित होऊन शेगावला जाण्याची इच्छा व्यक्त केल्याचे समजते. धीरेंद्र शास्त्री हे हेलिकॉप्टर ने शेगावला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे धीरेंद्र शास्त्री यांचे बुलढाणा जिल्ह्यात आगमन होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी गुड इव्हिनिंग सिटीला दिली आहे.