spot_img

“विजयराज यांच्याकडे दीड कोटींची गाडी आली कुठून? “

आ. संजय गायकवाड यांचा खळबळजनक आरोप

◾ योगेंद्र गोडेंचेही घेतले नांव

बुलढाणा, 28 डिसेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) :- विधानसभा निवडणूकीनंतर पहिल्यांदाच आ.गायकवाड यांनी आज  पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी आ.संजय गायकवाड यांनी महायुतीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघात भाजपच्या अनेक जणांनी काम केले. आरएसएस मधील आणि निष्ठावंत भाजपच्या लोकांचा पाठिंबा मिळाला.

आ.गायकवाड यांनी माजी आमदार विजयराज शिंदे यंाच्यावर गंभीर आरोप केले आहे. त्यांनी सांगितले की, विजयराज शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडून 5 कोटी रूपये घेतले. त्या मधील काही पैशात माजी आमदार विजयराज शिंदे यांनी ‘डिफेंडर’ गाडी घेतल्याचा आरोप केला आहे. त्याचप्रमाणे भाजप नेते योगेंद्र गोडे यांनी महायुतीचा धर्म पाळला नाही. विरोधी उमेदवाराकडे वीस हजार मते वळविण्यात ही मंडळी यशस्वी झाल्याचा आरोप आ.गायकवाड यांनी केला आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत