spot_img

‘उल्टा चोर कोतवाल को डांटे’.. कांझींमुळे राष्ट्रवादी सिंदखेडराजापुरतीच…

अनुजाताईंचा पत्रकार परिषद घेवून पलटवार

बुलढाणा, 7 फेब्रुवारी (गुड इव्हिनिंग सिटी) : अ‍ॅड.नाझेर काझी यांनी सिंदखेडराजा पुरताच पक्ष मर्यादित ठेवला असून अनेक पदे केवळ मर्जीतील कार्यकर्ते नसल्यामुळे रिक्त ठेवले आहेत. टीडी अंभोरे, मनीष बोरकर यांनी स्वतः डॉ.शिंगणे यांचे काम केलेले आहे आणि तेच मला निष्ठा शिकवत असतील तर दुर्दैव आहे… हा प्रकार म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाँटे असल्याचा घणाघात अनुजाताई सावळे यांनी केला आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदावरून राजीनामा दिल्यानंतर व काही राजकीय घडामोडीनंतर काल दिनांक 6 फेब्रुवारी रोजी अनुजाताई सावळे यानी पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपली भुमिका मांंडली.
त्यांनी यावेळी सांगितले की, गेल्या चार वर्षांपासून राष्ट्रवादी महिला काँगे्रसच्या जिल्हाध्यक्ष असतांना पक्ष विस्तारासाठी काम केले. त्या कामाची पावती नाझेर काझी यांच्याकडून नको आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.नाझेर काझी हे गेल्या 15 वर्षांपासून जिल्हाध्यक्ष पदावर असतांना त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत पक्षाच्या यशाचा आलेख हा नेहमी खाली खाली घसरतांना दिसतो. नाझेर काझी यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून सिंदखेडराजा पुरताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मर्यादित ठेवला आहे. मर्जीतील कार्यकर्ते नसल्याने पक्षातील अनेक पद रिक्त ठेवले आहे.त्यामुळे अ‍ॅड.काझी हे आपले अपयश लपविण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करतांना दिसून येत आहे. अ‍ॅड.काझी यांनी मला पदावरून काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पाच ते सहा वेळा उंबरठे झिजवले आहे. पण त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांसाठी अजितदादांकडे गेले असते  तर त्याचा फायदा झाला असता.
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीदरम्यान छगन भुजबळ यांच्या सभेला हजर असतांना माझ्यावर आरोप केले जात आहे.

याऊलट राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष टि.डी.अंभोरे यांनी विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडीचे काम केले आहे. तर सिंदखेडराजा मतदारसंघात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनिष बोरकर यांनी डॉ.राजेंद्र शिंगणेचे काम केले आहे.
मला पदावरून काढले नाही तर मी स्वतः पदाचा राजीनामा दिला आहे. निष्कासित करण्याचे रूपालीताई चाकणकर यांचे पत्र नंतरचे आहे. पक्षात काम केल्यानंतर ज्या पध्दतीने विविध पदाधिकार्‍यांनी आपले मत व्यक्त केले त्याबद्दल वाईट वाटले. कारण गेली चार वर्ष पक्षाच्या विस्तारासाठी प्रयत्न करून आज हे वाट्याला आल्याचे दुःख वाटते. मी पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या सदस्यत्वचा नाही. त्यामुळे मी अजून राष्ट्रवादी काँग्रेस सोडली नसतांना अशा प्रकारे पदाधिकारी टीका करत आहे हे खरच पक्ष शिस्तीला धरून आहे का ? याचा विचार वरिष्ठांनी करावा. चार पाच दिवसात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढे भुमिका मांडणार आहे. त्यानंतर पक्षात राहावयाचे किंवा नाही ते ठरवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत